‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे ही जोडी चर्चेत आली. या रिऍलिटी शोनंतर ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली. ते म्हणजे त्यांच्या लग्नामुळे. मुग्धा व प्रथमेश यांनी गेल्या वर्षी लग्नगाठ बांधली. डेस्टिनेशन वेडिंग करत दोघांनी हा विवाहसोहळा आटोपला. मुग्धा व प्रथमेशच्या विवाहसोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले. लग्नानंतर ही जोडी बरीच चर्चेत असलेली पाहायला मिळाली. (Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate)
मुग्धा व प्रथमेश हे लग्नानंतर त्यांच्या संसारात रमलेले पाहायला मिळाले. लग्नानंतर मुग्धा लाघाटेंच्या घरी बऱ्यापैकी रमलेली पाहायला मिळाली. प्रथमेश हा मूळचा कोकणातला असल्याने मुग्धा व प्रथमेश बरेचदा कोकणातील अनेक व्हिडीओ, फोटो शेअर करताना दिसतात. अशातच आता मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या एका स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मतदानासाठी मुग्धा व प्रथमेश त्यांच्या मूळघरी म्हणजेच गावी पोहोचले आहेत. कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत दोघांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.
आणखी वाचा – कलाकार मंडळींचा भाजपाकडे कल, शेखर सुमन यांचाही पक्षात प्रवेश

“आम्ही आज प्रवास करुन पुण्याहून अलिबागला आलो आणि मतदानासाठी अलिबागहून आरवलीला पोहोचलो. कृपया प्रत्येकाने जाऊन मतदानाचा हक्क बजावा. हे खूप महत्त्वाचं आहे. हे टाळू नका”, असं कॅप्शन देत मुग्धाने प्रथमेशबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. याशिवाय मुग्धाने आणखी एक स्टोरी पोस्ट केली आहे, यांत ती नाश्त्याचा आनंद घेताना दिसली.
मुग्धाने अलिबागला माहेरी आल्यानंतर तिच्या आईच्या हातच्या खास मिसळीवर ताव मारला. अलिबागला घरी आल्यावर आईची हातची मिसळ आणि संतोषचा वडा”, असं कॅप्शन देत तिने मिसळ व वड्याचा फोटो पोस्ट केला आहे. मुग्धा कामाच्या व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढत तिच्या घरातल्यांना, कुटुंबीयांना वेळ देताना दिसते. लग्नानंतर बरेचदा ते कोकणदौरा करतानाही दिसले. मुग्धा व प्रथमेशांच्या गायनाचे बरेच चाहते आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही मुग्धा व प्रथमेश गायनसेवा करण्यासाठी अनेकदा दौरे करताना दिसतात.