Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून प्रसिद्धी झोतात आलेले लोकप्रिय गायक व गायिका म्हणजे प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन. गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे यांनी ‘आमचं ठरलं’ म्हणत सोशल मीडियावरुन प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्यांच्या लग्नानंतर ही जोडी बरीच चर्चेत असलेली पाहायला मिळाली. मुग्धा व प्रथमेशच्या गायनाचे लाखो चाहते दिवाने आहेत. अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल गायनाचे शो करत त्यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. लग्नानंतर बरेचदा दोघेही एकत्र कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसले. विशेषतः प्रथमेश व मुग्धा यांची जोडी लग्नानंतर बरीच चर्चेत राहिलेली दिसली.
मुग्धा व प्रथमेश यांनी नोव्हेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अगदी शाही थाटामाटात मुग्धा व प्रथमेश यांनी लग्नसोहळा उरकला. मुग्धा व प्रथमेश ही जोडी गेल्यावर्षी २१ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकली. ‘आमचं ठरलं’ म्हणत एकत्र फोटो शेअर करत या जोडीने त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. डेस्टिनेशन वेडिंग करत अगदी पारंपरिक अंदाजात मुग्धा व प्रथमेश यांचा लग्नसोहळा उरकला.
आणखी वाचा – “सगळ्यांचं म्हणणं आहे लग्न कर आणि”…; डोक्याला बाशिंग बांधून जुई गडकरीचा व्हिडीओ व्हायरल, नवरीबाई नटली कारण…

दोघांच्या लग्नाला मनोरंजन विश्वातील बरेच कलाकार उपस्थित होती. नुकतेच यांच्या लग्नाला १० महिने पूर्ण झाले आहेत. लग्नाला १० महिने पूर्ण होताच मुग्धा व प्रथमेशने एक सेल्फी शेअर केला आहे आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये मुग्धा व प्रथमेश दोघेही खूप खुश दिसत आहेत. त्यांचा हा फोटो साऱ्यांच्या पसंतीस पडला आहे. गेल्यावर्षी मुग्धा-प्रथमेश यांचा विवाह झाला आज त्यांच्या लग्नाला १० महिने पूर्ण झाले आहेत.
आणखी वाचा – Video : शाहरुख खानच्या छोट्या लेकाच्या संस्काराचं कौतुक, ‘त्या’ कृतीच होतंय कौतुक, नक्की काय घडलं?
प्रथमेश व मुग्धा लग्नानंतर लगेचच कामाला लागले. गायन सेवा करत अनेक ठिकाणी दोघेही दौरे करतानाही दिसले. मात्र या दौऱ्यांमधून वेळात वेळ काढत ही जोडी एकमेकांसह वेळ घालवतानाही दिसते. विशेषतः प्रथमेश हा मूळचा कोकणचा असल्याने ते बहुदा कोकणात घरी जाताना दिसले आहेत. तर मुग्धा अलिबागची असल्याने त्यांचा अलिबाग आणि कोकण येथे येणं-जाणं सुरुच असतं आणि याचे अपडेट सोशल मीडियावरुन दोघेही देत असतात.