Abram Cute Reaction : शाहरुख खानचा छोटा अबराम खान नेहमीच त्याच्या गोंडस शैलीने व त्याच्यावरील संस्काराने साऱ्यांची मनं जिंकत असतो. अशातच आता सोशल मीडियावर अबरामच्या संस्कारांचे खूप कौतुक होत आहे. अलीकडेच अबरामने पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली आहेत. अबरामला शाहरुख सरांना सॅल्यूट म्हणायला सांगितल्यावर त्याने दिलेल्या प्रतिक्रियेने चाहत्यांना वेड लावले. अबरामची ही प्रतिक्रिया पाहून सारेजण त्याचं भरभरुन कौतुक करत आहेत. अबरामचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अबराम जेव्हा जेव्हा सार्वजनिक ठिकाणी दिसला तेव्हा तो नेहमीच चर्चेत असलेला दिसला. यावेळी जेव्हा तो कॅमेरासमोर आला तेव्हा त्याला पापाराझींना भेटून आनंद झाला. जेव्हा पापाराझींनी अबरामला बाय म्हटलं तेव्हा अबरामने अतिशय गोंडसपणे प्रतिक्रिया देत बाय म्हटलं. यानंतर जेव्हा पापाराझींनी अबरामला शाहरुख सरांना सॅल्यूट करायला सांगितले तेव्हा त्याने हसून होकार दिला. अबरामची ही क्यूट स्टाइल पाहून चाहते खूप कमेंट करत आहेत.
एका चाहत्याने लिहिले आहे, “किती क्यूट”, “छोट्या राजाने मनं जिंकलं”, “सगळ्यांची मनं जिंकली”, अशा अनेक कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “वय कमी असले तरी संस्कार छान आहेत”. शाहरुख खानने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत आपल्या लहान मुलाचे नाव अबराम का ठेवले याचे कारणही सांगितले होते.
आणखी वाचा – निवेदिता सराफ व मंगेश देसाई यांच्या नवीन मालिकेची वेळ जाहीर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
‘आप की अदालत’मध्ये शाहरुख म्हणाला होता, “सर्व प्रथम इस्लाममध्ये हजरत इब्राहिम यांना बायबलमध्ये अब्राहम म्हणून ओळखले जाते आणि यहुदी धर्मात त्यांना अबराम म्हणून ओळखले जायचे”. तो पुढे म्हणाला, “मला वाटले की माझी पत्नी (गौरी खान) हिंदू आहे आणि मी मुस्लिम आहे, आमच्या मुलांना घरात धर्मनिरपेक्षतेची भावना वाटावी अशी आमची इच्छा होती. अनेकांना हे आवडले नाही आणि तो वादात सापडला, पण आपल्या देशाप्रमाणे आपल्या घरातही धर्मनिरपेक्षता आहे, असे मी मानतो”.