शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate : ना अवाढव्य खर्च, ना महागडे कपडे; असा पार पडला मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेचा हळदी कार्यक्रम, फोटोंवर कौतुकाचा वर्षाव

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 20, 2023 | 12:42 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Haldi in Marathi

ना अवाढव्य खर्च, ना महागडे कपडे; असा पार पडला मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेचा हळदी कार्यक्रम, फोटोंवर कौतुकाचा वर्षाव

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Haldi and Wedding : मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. अशातच आणखी एक कलाकार जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. अल्पावधीतच या जोडीच्या हळदी समारंभाच्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ही कलाकार जोडी म्हणजे प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन. मुग्धा व प्रथमेश यांचं लवकरच लग्न होणार आहे. त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं समोर आलं आहे.

नुकतेच मुग्धा व प्रथमेश यांच्या हळदी समारंभातील फोटो समोर आले आहेत. दोघांनी त्यांच्या हळदी समारंभातील खास क्षण सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. मुग्धा व प्रथमेशची हळद पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली आहे. प्रथमेशने त्याच्या हळदी समारंभातील खास फोटो शेअर करत “हरिद्रा लापन । मांगलिक स्नान” असं म्हटलं आहे. या फोटोंमध्ये नववराचा लूक खुलून आलेला दिसतोय.

आणखी वाचा – मुग्धा वैशंपायनला लागली प्रथमेश लघाटेच्या नावाची हळद, घरी नातेवाईकांची गर्दी, धमाल-मस्ती अन्…; सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Umesh Laghate (@prathamesh_laghate_adhikrut)

तर गायिका मुग्धाने तिच्या हळदी समारंभातील फोटो शेअर केले आहेत. मुग्धाची हळद तिच्या घरी साजरी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मुग्धाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर तेज आलेलं पाहायला मिळत आहे. मुग्धाने शेअर केलेल्या हळदीच्या फोटोंमध्ये तिचं संपूर्ण कुटुंबही पाहायला मिळत आहे. दोघांनी अत्यंत साधेपणाने त्यांची हळद उरकली आहे. त्यांनी शेअर केलेल्या हळदीच्या फोटोंवरून मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

आणखी वाचा – हळद लागली! प्रथमेश लघाटेच्या हळदी सोहळ्याचा थाट, पारंपरिक पद्धतीने पार पडला कार्यक्रम, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात

View this post on Instagram

A post shared by Mugdha Bhagawan Vaishampayan (@mugdhabhagawan5)

प्रथमेश व मुग्धा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावरूनच त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली चाहत्यांसह शेअर केली होती. तेव्हापासून सगळ्यांना मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली होती. आता चाहत्यांची ही उत्सुकता लवकरच पूर्ण होणार असून ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. याआधीही दोघांच्या केळवणाचे, व्याहीभोजनाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Tags: entertainmentmugdha vaishampayanprathamesh laghateprathamesh laghate and mugdha vaishampayan wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding

"नवीन आयुष्याची सुरुवात झाली…", लाजत सुरुची अडारकरचा नवऱ्यासाठी खास उखाणा, म्हणाली, "नाव घ्यायला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.