Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय गाण्याच्या शोमधून प्रसिद्धी झोतात आलेले लोकप्रिय गायक व गायिका म्हणजे प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन. मुग्धा व प्रथमेश लघाटे ही मराठी संगीत विश्वातील सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या जोड्यांपैकी एक जोडी आहे. सोशल मिडियावर चर्चेत असणाऱ्या लोकप्रिय कपलच्या यादीत एका जोडीचं नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे मुग्धा व प्रथमेश. मुग्धा व प्रथमेश हे त्यांच्या लग्नानंतर बरेच चर्चेत असलेले पाहायला मिळाले. सोशल मिडियावर ही जोडी विशेष सक्रिय असलेली पाहायला मिळते. नेहमीच ते दोघेही सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.
आपल्या गायनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी ही जोडी सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अनेकदा हे दोघे त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमाची माहिती, गाण्याचे व्हिडीओ किंवा अगदी त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी असो, सोशल मीडियाद्वारे शेअर करत त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. मुग्धा व प्रथमेश हे दोघे एकत्र महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरही अनेक ठिकाणी गायनाचे कार्यक्रम करत असतात. याबद्दलची माहितीही ते सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात.
आणखी वाचा – ‘अप्पी आमची…’मधील अमोल खऱ्या आयुष्यात झाला दादा, बहीण झाल्यानंतर साईराजचा आनंद गगनात मावेना, फोटो व्हायरल

अशातच आता ही जोडी गुजरात येथे गाण्याच्या सादरीकरणासाठी पोहोचली आहे. गायनासाठी मुग्धा व प्रथमेश हे श्री श्रेत्र गिरनार, श्री दत्त गुरुंचे तपश्चर्या स्थान येथे पोहोचले आहेत. गिरनार क्षेत्राला जातानाचे काही खास फोटो त्यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. यापूर्वी ही जोडी बरेचदा महाराष्ट्राबाहेर अगदी परदेशातही गायनसेवा करताना दिसली. आता दोघांनी गुजरात येथील गिरनार क्षेत्राला भेट देत तिथे गायनसेवा केली आहे.
आणखी वाचा – कर्करोगामुळे हिना खान पूर्णच खचली, वाढत्या वजनासह सहन न होणाऱ्या वेदना, म्हणाली, “गे १५ ते २० दिवस…”
‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या कार्यक्रमापासूनच मुग्धा व प्रथमेश यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशभरात दोघांचे अनेक चाहते आहेत. अनेकदा ही जोडी कामाव्यतिरिक्त अनेक ठिकाणांना भेट देत फिरताना दिसते.