सिनेसृष्टीतील गायन क्षेत्रातील प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे. ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून घराघरांत पोहोचलेली ही जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या गायनातून रसिक प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. जगभरात या जोडीचे लाखो चाहते दिवाने आहेत. मुग्धा व प्रथमेश यांचे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही चाहते आहेत. बरेचदा ही जोडी चाहत्यांच्या प्रेमासाठी परदेश दौरे करताना दिसते. (Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate)
‘आमचं ठरलं’ म्हणत या जोडीने त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. तेव्हा साऱ्यांना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर मुग्धा व प्रथमेश यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. मुग्धा व प्रथमेश यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. डेस्टिनेशन वेडिंग करत या जोडीने सप्तपदी घेतले. सोशल मीडियावर मुग्धा व प्रथमेश बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात.
लग्नानंतर मुग्धा व प्रथमेश यांच्या लग्नानंतर ही जोडी कामाला लागली असल्याचं पाहायला मिळत आहे. दोघेही गायनाचे कार्यक्रम करताना दिसले. अशातच या कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत मुग्धा व प्रथमेश कोकण दौरा करण्यात व्यस्त आहेत. मुग्धा व प्रथमेश यांनी कोकणात फिरतानाचे अनेक फोटो व व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्टही केले आहेत. सध्या मुग्धा व प्रथमेश एकत्र फिरताना, धमाल मस्ती करताना दिसत आहेत. गावाकडे जाऊन अनेक ठिकाणी ते फिरायला गेले असल्याचंही पाहायला मिळालं.
कोकणात फिरताना दोघांनी रत्नागिरीमध्ये मिसळीवर ताव मारलेला पाहायला मिळत आहे. तर कोकणातल्या उन्हावर मात करण्यासाठी त्यांनी कोकम सरबतही प्यायलं आहे. मुग्धा तिच्या कोकणातल्या घरी रमलेली ही दिसली. सासरहून निघाल्यानंतर आता मुग्धा तिच्या माहेरी अलिबागला पोहोचली आहे. अलिबागला पोहोचल्यानंतरचा फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे.