मराठीतील आघाडीची अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आजवर अनेक मालिका व सिनेमे केले असून तिने साकारलेल्या भूमिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ‘कुंकू’ मालिकेतून पदार्पण करणाऱ्या मृण्मयीने आतापर्यंत नटसम्राट, मन फकिरा, चंद्रमुखी, शेर शिवराज यांसारखी अनेक सिनेमे केलेत असून अनेक शो व पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालनही तिने केलेलंय. त्याबरोबरच मराठी व हिंदी वेबसिरीजमध्ये मृण्मयी आपल्याला दिसलेली आहे. (mrunmayee deshpande will host saregamapa little champs new season)
मराठी मनोरंजनविश्वातील ही अभिनेत्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ती एका सिंगिंग रिऍलिटी शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच या शोचा प्रोमो समोर आला, ज्यात मृण्मयी पुन्हा एकदा या भूमिकेत दिसेल.
मृण्मयी पुन्हा एकदा सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत, प्रोमो समोर (mrunmayee deshpande will host saregamapa little champs new season)

झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. शोच्या माध्यमातून पुढे आलेले अनेक गायक आज आघाडीच्या गायकांमध्ये गणले जातात. त्याचबरोबर शोमधील स्पर्धकांच्या गाण्यांवरही रसिक भरभरून प्रतिसाद देतात. छोट्या पडद्यावरील हा सिंगिंग रिऍलिटी शोचे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पहिला प्रोमो जेव्हा समोर आला, तेव्हापासून प्रेक्षक याची औत्सुक्याने वाट पाहतायत. आता याचा नवा प्रोमोही समोर आला असून प्रोमोमध्ये मृण्मयी व शोचे परीक्षक दिसतायत. (zee marathi saregamapa little champs)
नुकतंच आलेल्या प्रोमोनुसार, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या यंदाच्या पर्वात गायक-संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी, मराठी व बॉलीवूडमधील आघाडीची गायिका वैशाली माडे आणि ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर हे परीक्षकाच्या भूमिकेत दिसतील. तर मृण्मयी सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी मृण्मयीने शोच्या मागील पर्वाचे सूत्रसंचालन केलेलंय. ९ ऑगस्टपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पुन्हा एकदा तिला या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक झाले.
अभिनेत्री मृण्मयीबरोबरच तिची बहीण गौतमी देशपांडेही मनोरंजनसृष्टीत सक्रिय आहे. दोघींचं छान बॉंडिंग असून सोशल मीडियावरही या बहिणी अनेकदा मजामस्ती करताना दिसून येतात. (mrunmayee deshpande will host saregamapa little champs)
हे देखील वाचा : ‘लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलो आणि…’, असा दिला अतुल परचुरेंनी कॅन्सरशी लढा