Swanand Tendulkar and Gautami Deshpande Wedding : अभिनेत्री गौतमी देशपांडे ही मराठी सिनेसृष्टीतील काही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना?’ या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते आणि गेले काही दिवस ती आणखीणच चर्चेत आली आहे आणि या चर्चेचं मुख्य कारण म्हणजे तिचं लग्न. अभिनेत्री गेले काही दिवस तिच्या लग्नामुळे सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
अभिनेत्री अभिनेता व इन्फ्लुएंसर स्वानंद तेंडुलकरबरोबर रिलेशनमध्ये होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्या रिलेशनशिप बद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र गौतमीने याबद्दल कुठेही भाष्य केले नव्हते. पण गौतमीची बहीण मृण्मयीने त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात केल्यामुळे त्यांच्या रिलेशनविषयी व लग्नाविषयी साऱ्यांनाच खबर लागली. अशातच शनिवारी (२३ डिसेंबर) रोजी गौतमीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे मेहेंदी सोहळ्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत अप्रत्यक्षपणे आपल्या प्रेमाची कबुलीदेखील दिली.

आणखी वाचा – संगीत सोहळ्यासाठी स्वानंदी-आशिष यांचा वेस्टर्न अंदाज, झगमगीत कपडे अन् डायमंड ब्रेसलेट…
गेले दोन दिवस त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असून याचे काही खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच एक व्हिडीओ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. नुकताच गौतमी-स्वानंद यनचा संगीत सोहळा पार पडला आणि सोहळ्यात त्यांच्या आईने खास गाणे गायले. गौतमीच्याअ आईने आशा भोसले यांचं ‘आओ हुजूर तुमको’ हे लोकप्रिय गाणं गायलं. आई गातानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये गौतमी व बहीण मृण्मयी दोघी एकमेकींचा हात धरून थिरकत आहेत.
आणखी वाचा – मॉडर्न अंदाजात थिरकले गौतमी-स्वानंद, संगीत सोहळ्यामधील व्हिडीओ आला समोर, पाहा खास क्षण
दरम्यान, गौतमी-स्वानंद यांनी त्यांच्या या खास संगीत सोहळ्यासाठी विशेष लूक केला होता. त्यांचा हा खास लूक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. गौतमी-स्वानंदीच्या संगीत सोहळ्यातील हे खास क्षण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यांच्या अनेक चाहत्यांनी या फोटो व व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला. तसेच त्यांचे हे खास फोटो व व्हिडीओ पाहून त्यांचे अनेक चाहते दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.