कलाकारांप्रमाणेच स्टार किड्स देखील नेहमी चर्चेत असतात. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात.तर अश्यातच मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानीस हिने लेकीचा एक व्हिडीओ शेअर केला.(Mrunal dusanis )
अभिनेत्री मृणाल दुसानीस ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. त्यानंतर मृणालने बऱ्याच मराठी मालिकांमध्ये काम केलं. पण लग्नानंतर तिने ब्रेक घेतला. काही महिन्यांपूर्वी मृणालने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही गुडन्यूज तिने सोशल मीडियावरून चाहत्यांबरोबर शेअर केली होती.मृणाल दुसानीसने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला असला तरीही, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र नेहमी सक्रिय असते. ती आपल्या लेकीबरोबरचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आताही मृणालने लेक नुर्वी खूपच गोडआहे. असाच एक क्युट व्हिडीओ तिने शेअर केला.
या व्हिडिओत नुरवी गाडी चालवत आहे. तिचे बाबा तिला गाडी चालवायला शिकवतात.तसेच या व्हिडिओत ती क्युट एक्सप्रेसशन देतेय.हा व्हिडीओ शेअर करत मृणालने लिहिलं, my baby गर्ल.तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी यावर कमेंट्स करत नुर्वीला किती गोड असं म्हणत अनेक कमेंटचा वर्षाव केलाय.(Mrunal dusanis )
हे देखील वाचा – ‘प्रियाच्या बालपणीचं घर’ -आठवणीत शेअर केला व्हिडिओ
मृणालने २०१६ मध्ये नीरज मोरेसोबत लग्नगाठ बांधली.तो सॉफवेअर इंजिनिअर आहे. त्यामुळे तो कामानिमित्त अमेरिकेत राहतं असल्यामुळे मृणाललाही तिकडेच स्थायिक व्हावे लागले. सुखांच्या सरी या मालिकेच्या वेळी ती भारतात आणि तो अमेरिकेत राहतं होता.पण मालिका संपताच ती अमेरिकेत स्थायिक झाली.तिचा तिकडे बदललेला लूक पाहून चाहते थक्क राहिले.ती जरी अमेरिकेत असली तरीही ती सोशल मीडियावरून तिचे अपडेट चाहत्यांना देत असते.तरीही मृणालचे चाहते मात्र तिची प्रतीक्षा करत आहेत. ती कधी स्क्रीनवर दिसतेय, याची वाट बघत आहेत.तर आता मृणाल पुन्हा सिनेसृष्टीत येणार का? हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
