सिनेमासृष्टीत बरीचशी कुटुंब आहेत ज्यांच्या घरातील सगळीच मंडळी कलाविश्वात कार्यरत आहेत. आणि यापैकी उदाहरण द्यायचं झालं तर एक नाव म्हणजे कुलकर्णी कुटुंब. दिग्गज अभिनेत्री, दिग्दर्शिका म्हणून आजवर मृणाल कुलकर्णी यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. शिवाय मृणाल यांचा मुलगा विराजस कुलकर्णी आणि सून शिवानी रांगोळे यांनीही कलाविश्वात आपलं स्थान पक्के केलं आहे. विराजस आणि शिवानी यांच्या लग्नानंतर शिवानीला ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून खूप मोठा ब्रेक मिळाला.(Mrinal Kulakarni Kavita Medhekar)
शिवानीने याआधीही बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावतेय. या मालिकेत शिवानीच्या सासूच्या भूमिकेत अभिनेत्री कविता मेढेकर या पाहायला मिळत आहेत. मालिकेत भुवनेश्वरी हे पात्र कविता मेढेकर साकारत असून कडक सासूबाईंच्या भूमिकेत त्या पाहायला मिळत आहेत.
पाहा मृणाल यांनी का भरला कविता यांना दम (Mrinal Kulakarni Kavita Medhekar)
या उलट खऱ्या आयुष्यातील शिवानीची सासू ही अत्यंत गोड असून शिवानी आणि मृणाल यांचं उत्तम बॉण्डिंग असलेलं पाहायला मिळतंय. सासू सुनेची ही उदाहरण द्यावी अशी जोडी आहे. दरम्यान मालिकेत शिवानीची सासू भुवनेश्वरी ही शिवानीला त्रास देताना दिसतेय हे चित्र पाहून मृणाल कुलकर्णी यांनी गमतीत कविता मेढेकर यांना एक पोस्ट शेअर करत सक्त ताकीद दिली आहे.(Mrinal Kulakarni Kavita Medhekar)
मृणाल कुलकर्णी यांनी अभिनेत्री कविता मेढेकर सोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. यांत त्या दोघी हसताना दिसत आहेत, यावरून त्यांच्यात चांगली मैत्री असलेलं कळतंय. बरं हा फोटो जरी आनंदात दिसत असला तरी मृणाल यांनी कविता यांना पोस्टखाली कॅप्शन लिहीत दम भरला आहे. कॅप्शन मध्ये त्यांनी आमच्या सुनेला जास्त त्रास नको देऊ बरं का! नाहीतर तुला शिकवीन चांगलाच धडा!? असं म्हटलंय.
हे देखील वाचा – निवेदिता ताईंची विवेकला खास भेट
मृणाल यांनी कविता यांना दिलेली गमतीशीर मात्र सक्त ताकीद पाहून चाहत्यांनी ही मजेशीर कमेंट केल्या आहेत.
