Mauni Roy Surgery : शस्त्रक्रिया करणे हे सिनेविश्वात अगदी सामान्य आहे. कधीकधी हीच शस्त्रक्रिया कलाकारांना सुंदर बनवते तर कधीकधी त्यांच्या चेहऱ्याचा नकाशाच बदलते. अभिनेत्री मौनी रॉय हिच्याबाबतीतही असेच काहीसे घडले आहे. काल मौनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये तिच्या कपाळावर रेषा दिसल्या. आणि याचे कारण शस्त्रक्रिया असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं. यानंतर आता दुसरा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांचे ओठ फारच विचित्र दिसत आहेत. सूजलेल्या ओठांनी तिचा लूकही बिघडलेला दिसत आहे. मौनी रॉय एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी अभिनेत्रीच्या ओठांनी प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले. यावेकी तिची हेअरस्टाईलही तिने बदललेली दिसली.
बर्याच लोकांनी तिच्या या लूकचे भरभरुन कौतुक केले. परंतु काहींनी याला प्लास्टिक सर्जरी केली असल्याचं म्हटले. लोकांनी कपाळावरच्या रेषा आणि बदललेल्या ओठांवर प्रतिक्रिया दिली. काहींनी बोटॉक्स आणि ओठ फिलरचा परिणाम असंही वर्णन केलं. मौनी रॉयचा व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्याने लिहिले, “मौनी मौनीसारखे दिसत नाही. ती कोण आहे हे मला कॅप्शनमध्ये पाहावे लागले”.
आणखी वाचा – Ghibli ट्रेंड नक्की कसा सुरु झाला?, या कंपनीचा मालक कोण?, एकूण कमाई आहे तब्बल…
तर एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “शस्त्रक्रिया करुन पूर्णतः वाट लावली आहे. ओळखणंही कठीण झालं आहे. आणि ही इतकी क्युट कशी असू शकते”. तर आणखी एका नेटकऱ्याने असं म्हटलं आहे की, “शस्त्रक्रियेचे दुकान. संपूर्ण चेहर्याचा नक्षाच बदलला आहे. जशी मुलं वाकडे तिकडे फोटो काढतात तसे काहीसे डॉक्टरांनी केलं आहे”. एकाने लिहिले आहे की, “त्यांना तरूण वाटण्यासाठी किती शस्त्रक्रिया करावी लागेल”.
आणखी वाचा – हत्या करुन तीन वर्षाच्या चिमुकलीला सुटकेसमध्ये भरलं; ‘त्या’ शेजाऱ्याला काय मिळालं?
१८ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द भूतनी’ या चित्रपटात मौनी रॉय दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्त, सनी सिंग, आसिफ खान आणि पलक तिवारी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धांत कुमार सचदेव यांनी केले आहे आणि संजय दत्त, मान्यता दत्त, दीपक मुकुट, हूनर मुकुट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.