मनोरंजनाचे साधन म्हणून अभिनयाकडे जसे पाहिले जाते, अगदी तसेच आजच्या जगात रिलस्टार्सच्या रिलकडेही पाहिले जाते. सोशल मीडियावर हे रीलस्टार त्याच्या फनी कंटेन्टमधून लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतो. शिवाय निरनिराळ्या पद्धतीने कधी कॉमेडी, तर कधी सामाजिक विषयावर कंटेन्ट क्रिएट करून ते सगळ्यांच्या मनावर राज्य करतात. महाराष्ट्रात असे अनेक रिल स्टार आहेत ज्याचे चाहते केवळ सोशल मीडियावरील प्रेक्षकच नाही, तर कलाकार व अनेक क्षेत्रातील मान्यवर देखील आहेत. कारण हे रिलस्टार्स आपला स्वतःचा कंटेन्ट प्रेक्षकांना दाखवतात.
अश्याच रिलस्टार्सच्या सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मुंबईत ‘महाराष्ट्र नवनिर्माण Reel Baaz पुरस्कारा’चं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील प्रसिद्ध रील्सस्टार्सचा सन्मान करण्यात आला. तसेच रील स्टार्सशी संवाद साधताना त्यांनी आपलं भाषण मध्येच थांबवत आपल्या आवडत्या रील स्टार्सला स्टेजवर बोलावलं होतं. (reel baaz awards)
पाहा काय म्हणाले राज ठाकरे (raj thackeray on atharva sudame)
राज ठाकरे यांचं भाषण सुरु असताना मध्येच आपलं भाषण थांबवलं आणि त्या रिलस्टारवर त्यांची नजर पडली. तेव्हा त्यांनी “अरे तू पण आलास का? हा माझा अत्यंत आवडता. तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाहत असतो बरं का…” असं राज ठाकरे यांनी त्या रिलस्टारला उद्देशून म्हणाले आणि त्याला स्टेजवर बोलावून घेतले. राज ठाकरेंच्या या कौतुकाने हा रिलस्टार भारावून गेला होता. हा रील्स स्टार दुसरा तिसरा कोणी नसून तो होता पुण्याचा अथर्व सुदामे. (raj thackeray on atharva sudame)
अथर्व सुदामे हा २६ वर्षीय रिलस्टार अस्सल पुणेरी शैलीत मजेशीर रील्स बनवण्यासाठी ओळखला जातो. अथर्वचे शिक्षण बी.कॉमपर्यंत झाले असून त्याच्या रिल्समध्ये पुणेरी टोमणे व भन्नाट इरसालपणा भरपूर पाहायला मिळतो. अथर्व सुदामेचे इंस्टाग्रामवर ७ लाखाहून अधिक फॉलोवर्स, तर युट्युबवर ४ लाख सब्सक्रायबर्स आहेत. (atharva sudame)
हे देखील वाचा : “दिग्दर्शक,निर्मात्यांसोबत खूप भांडणं झाली कारण…” शरद पोंक्षेनी केला खुलासा