बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मिलिंद गुणाजींचा अमिताभ बच्चनसह काम करण्यास नकार अन्…; अभिनेत्याने खुलासा करत सांगितलं नेमकं काय घडलं होतं?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 28, 2024 | 1:29 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
milind gunaji incident

मिलिंद गुणाजींचा अमिताभ बच्चनसह काम करण्यास नकार अन्…; अभिनेत्याने खुलासा करत सांगितलं नेमकं काय घडलं होतं?

अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मॉडेलिंग केले. विशेष नामांकित कंपन्यांमध्ये मॉडेल म्हणून जाहिरात केल्या. त्यानंतर मालिका, चित्रपटसृष्टीत त्यांचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरु झाला. ‘कुरुक्षेत्र’सारख्या लोकप्रिय मालिकेत काम केल्यानंतर ‘फरेब’, ‘द्रोहकाल’, ‘विरासत’ अशा विविध मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता व खलनायक म्हणून काम केले. हिंदी, मराठी चित्रपटांबरोबर साऊथ इंडियन व इंग्रजी चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. मिलिंद गुणाजी यांना ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र मिलिंद यांची अमिताभ यांच्यासह स्क्रीन शेअर करण्याची संधी हुकली. यादरम्यान, मिलिंद यांनी अमिताभ यांच्यासह काम करण्यास नकार दिला असल्याच्या बातम्या समोर आल्या. यावेळी नेमकं काय घडलं होतं याचा किस्सा मिलिंद यांनी ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत दिला आहे. (Milind Gunaji Incident)

मिलिंद म्हणाले, “माझ्या आठवणीप्रमाणे तेव्हा मी ‘विरासत’ चित्रपटाचं शूटिंग करत होतो. तेव्हा सगळे मोठे चित्रपट सुरू होते. ‘मृत्यूदाता’ नावाचा चित्रपट साइन केला होता. त्यात मी मुख्य खलनायक करत होतो अमिताभ बच्चन यांच्या विरुद्ध. त्याच वेळेला ‘विरासत’च्या सेटवर अपघात झाला काहीतरी आणि सगळ्या डेट बदलल्या. मी ज्या डेट ‘मृत्यूदाता’साठी दिलेल्या त्या आणि या चित्रपटाच्या डेट क्लॅश व्हायला लागल्या. मला जाणवलं की आपण हा चित्रपट नाही करू शकत. उगीच कुणाला खोट्या आशेला का ठेवायचं. मी मेहुल कुमार यांना स्पष्ट सांगितलं की असं असं आहे. मी इथे अटकलोय कदाचित मी नाही करू शकणार हे. तो म्हणाला ठीक आहे. मी त्यांना बोललो पण की एवढी मोठी संधी आहे. अमिताभ यांच्या विरुद्ध काम करायला मिळत होतं. मला वाईटही वाटतंय. काय करू पण”, असं ते म्हणाले.

आणखी वाचा – आता एकमेकांचं जमेना! लग्नाच्या दोन वर्षांनंतर विकी कौशलने कतरिनाबरोबरच्या नात्याबाबत पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाला, “आता पहिल्यासारखं…”

मिलिंद पुढे म्हणाले, ‘त्यानंतर मग काही दिवसांनी टिपिकल हिंदी आणि इंग्लिश मॅगझीनमध्ये छापून यायला लागलं की ‘मिलिंद गुणाजी जैसे नये कलाकार का अमिताभ के साथ काम करने को इन्कार.’ मी म्हटलं हे काय लफडं आहे. मी तर असं काहीच केलं नाही. मी काही त्यांच्यासोबत काम करायला नकार दिलेला नाही. मी उगीच त्यांच्या वाकड्यात का शिरू. मी म्हटलं हे प्रकरण सोडवणं गरजेचं आहे. मग मी माझ्या सेक्रेटरीला सांगितलं की जरा अमिताभ यांची अपॉइंटमेंट मिळतेय का बघा. त्यांनी अमिताभ यांच्या सेक्रेटरीला फोन केला. त्याने सांगितलं ते इथे इथे शूटला आहेत. तिथे जाऊन भेटा. मी गेलो”, असं ते म्हणाले.

आणखी वाचा – ऐश्वर्या नारकर यांच्या पारंपरिक मंगळसूत्राच्या डिझाइनने वेधलं लक्ष, आहे फारच युनिक, काळ्या मण्यांमध्ये कमी प्रमाणात सोन्याचा वापर अन्…

यापुढे अमिताभ यांना भेटल्यानंतरचा किस्सा सांगत ते म्हणाले, “तिथे अमिताभ आपला शॉट देऊन व्हॅनिटीमध्ये जात होते. मला पाहून ते थांबले. मी त्यांना सांगितलं असं काही नाही आहे. ते म्हणाले, ‘अरे तू टेन्शन घेऊ नको. आम्हाला माहीत असतं काय खरं आहे आणि काय खोटं आहे. हे मॅगझीनकडे वगैरे लक्ष द्यायचं नाही. तेव्हा कुठे मी जरा निर्धास्त झालो”.

Tags: amitabh bachchanentertainmentmarathi actorMilind GunajiMilind Gunaji Incident
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Ambani family build temple

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधी बांधली १४ मंदिरं, भव्यता पाहून तुम्ही चक्रावाल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.