कलाकार जेवढा अभिनयात सक्रिय तेवढाच आजूबाजूला घडत असलेल्या घटनांशी ही जागरूक असतो. सामाजिक जीवनात प्रेक्षकां पर्यंत काय पोहचवावं काय नको हे भान असणारा अजून एक कलाकार म्हणजे अभिनेता मिलिंद गवळी. जुन्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या पुढे आलेलं नाव सध्या स्टार प्रवाहवर दीर्घकाळापासून सुरु असलेल्या आई कुठे काय करते या मालिकेत दिसून येत. हा अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी.(Milind Gawali on marathi movies)
या मालिकेतील त्यांच्या कामामुळे प्रेक्षकांची त्यांना चांगलीच पसंती मिळत आहे. नकारात्मक भूमिका असुनही प्रेक्षकांची वाहवा मिळवणं कोणालाही सहज शक्य होतं नाही. परंतु मिलिंद गवळी यांच्या बाबती ही गोष्ट अपवाद ठरते. आई कुठे काय करते या मालिकेत मिलिंद यांनी साकारलेली अनिरुद्धची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावलेली दिसते. अरुंधतीला त्रास दिल्यामुळे काहींना अनिरुद्ध म्हणून ते आवडतही नाहीत पण मिलिंद म्हणून त्यांच्यावर प्रेम करणारे ही कमी नाहीत.

अभिनया सोबतच प्रेक्षकांशी अनेक गोष्टी, अनुभव , किस्से मिलिंद गवळी आपल्या सोशल हॅन्डल्स वरून शेअर करत असतात. मागे देखील त्यांनी सांगितलेला असाच एक किस्सा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. आता देखील त्यांनी असाच एक किस्सा शेअर केला आहे. ज्या मध्ये त्यांनी त्यांच्या रिलीज न झालेल्या एका चित्रपटा बद्दल सांगितलं आहे.
काय आहे मिलिंद यांची पोस्ट?(Milind Gawali on marathi movies)
मिलिंद यांनी इन्स्टावर एक पोस्ट करत त्यांच्या या चित्रपटाबद्दल सांगितलं आहे. काही फोटो पोस्ट करत फोटोच्या कॅप्शन मध्ये ते म्हणतात “”तेजस्विनी” माझा डबल रोल, चित्रपट 90% पूर्ण,चित्रपटात महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणारे अतिशय गोड व्यक्तिमत्व म्हणजे आनंद अभ्यंकर,मुंबई पुणे हायवे अपघातात गेले,निर्माते मस्के त्यांचं राहतं घर गहाण ठेवलं होतं हा चित्रपट करण्यासाठी,या चित्रपट शर्वरी जमिनीस , डॉक्टर विलास उजवणे असे कलाकार आहेत,दिग्दर्शक सतीशराव रणदिवे यांच्याबरोबरचा माझा पाचवा का सहावा चित्रपट होता, आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केला हा चित्रपट पूर्ण करून तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा पण काही गोष्टी आपल्या हातातच नसतात, प्रत्येक चित्रपटाचं आपलं नशीब असतं. “तेजस्विनी” चित्रपटाचे आमचे प्रोड्युसर मस्के यांचं राहतं घर जे गहाण होतं , ते कालांतराने कन्स्ट्रक्शनच्या धंद्यातून सोडून घेण्यात त्यांना यश मिळालं, त्या घरामध्ये तेजस्विनी चित्रपटाचे नऊ अतिशय उत्कृष्ट गाणी आणि 90% पूर्ण झालेला चित्रपट , कुठल्यातरी कोपऱ्यात पडला असेल.”

पोस्ट मध्ये त्यांनी महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे पण महाराष्ट्र मराठी सिनेमांचा नाही ही खंत देखील व्यक्त केली आहे. मिलिंद यांनी पोस्ट मध्ये लिहिलं आहे “आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांपेक्षा भोजपुरी नेपाळी चित्रपट जास्ती पैसा कमावतात, south च चित्रपट तर पैसा कमावतातच कमवतात, latest Pushpa Telugu, KGF & Kantara Kannada, फॉरेन फिल्म तर आहेतच महाराष्ट्रात थेटर मधनं खोर में खोर्याने पैसा कमवायला Statistics काढले Research केलातर किती मराठी प्रोड्युसर survive झाले आहेत,जगले आहेत किंवा जिवंत राहिले आहेत, (पैसे कमवणे तर लांबच राहिलं.)हा खरा आकडा जर लोकांसमोर आला , तर धक्का बसेल,आणि मराठी चित्रपट चांगले नसतात किंवा वाईट असतात असं नाहीये, अतिशय सुंदर विषय सादरीकरण आणिउत्तम अभिनय ,असलेले असंख्य चित्रपट येऊन गेले,मराठी प्रोडूसर मात्र जगला नाही”(Milind Gawali on marathi movies)
====
हे देखील वाचा – “आमच्या घरी एक राजकारणी यायचे त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड माज दिसायचा” मिलिंद गवळी यांची ती पोस्ट चर्चेत
====
मराठी भाषेतील चित्रपट आणि महाराष्ट्रात मराठी सिनेमांना मिळणारा प्रतिसाद यावर मिलिंद यांचे विचार प्रत्येकाला विचार करायला भाग पाडतात.