बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “मोदकाचा मोमो झाला”,स्वानंदी टिकेकरला बनवता येईना मोदक, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात, “हे काय केल तू?”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 19, 2023 | 6:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Swanandi Tikekar Making Modak

Video : "मोदकाचा मोमो झाला",स्वानंदी टिकेकरला बनवता येईना मोदक, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात, "हे काय केल तू?"

गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र धमाल करतानाचे वातावरण आहे. गणरायाच्या स्वागतासाठी सगळेचजण तयारी करण्यात व्यस्त आहेत. आज गणरायाचं आगमन झालं असून त्याच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवण्यात आले आहेत. सगळ्यांच्या घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे उकडीचे मोदक बनवून बाप्पासाठी नैवेद्य दाखवला जातो. अशातच कलाकारांच्या घरी ही गणेशोत्सवाचं जोरदार आगमन झालं आहे. अनेक कलाकार मंडळींनी बाप्पाचं जोरदार स्वागत केलं आहे. अभिनेत्री स्वानंदी टिकेकरच्या घरी ही बाप्पाचं आगमन झालं आहे. (Swanandi Tikekar Making Modak)

स्वानंदीने लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी खास उकडीचे मोदक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. स्वानंदीने मोदक बनवतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे. मात्र मोदक बनवण्याचा तिचा प्रयत्न फसलेला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला. अनेक प्रयत्ना नंतरही स्वानंदीला काही मोदकाचा आकार जमला नाही. मोमोज सारखा मोदकाचा आकार झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. स्वानंदीने या व्हिडीओला “मोदकचा झाला मोमो” असं कॅप्शन दिलं आहे.

आणखी वाचा – “कठोर निर्णय, वाद…”, ‘झी मराठी’मध्ये जॉब करत होता अद्वैत दादरकर, राजीनामा दिल्यानंतर म्हणाला, “जास्त अपयशच आलं आणि…”

View this post on Instagram

A post shared by Swanandi ???? (@swananditikekar)

स्वानंदीच्या या मोदक बनवतानाच्या मजेशीर व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. चाहत्यांनी केलेल्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्वानंदीच्या या व्हिडिओवर अभिनेता यशोमनने कमेंट करत लिहिलं “वाह!!! ओ कुलकर्णी!!! मुलीला मोदक जमत नाहीत! आता बसा बोंबलत” अशी कमेंट केली असून यावर स्वानंदीच्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजेच आशिष कुलकर्णीने बायकोची बाजू सांभाळून घेत “काही हरकत नाही, मी घेतोय शिकून” असं म्हटलं आहे. तर एका चाहत्याने गमतीशीर कमेंट करत म्हटलं आहे की, “ठीक आहे ग, अगदी कचोरी नाही झाली ना, मग चालेल” असं म्हटलं आहे. तर आणखी एका युजरने, “खाणंच सोप आहे, जावू द्या करायच्या भानगडीत नका पडू” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – पार्टी, एकांत, आठवणी अन्…; असं होतं सई ताम्हणकरचं जुनं घर, नव्या घरात शिफ्ट होताना रडू लागली अभिनेत्री, म्हणाली, “ज्या घरामध्ये…”

काही दिवसांपूर्वी स्वानंदी व आशिषने ‘आमचं ठरलं’ असं म्हणत जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर या दोघांनी थाटामाटात साखरपुडा सोहळा उरकला. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले होते.

Tags: ashish kulkarnientertainmentswanandi tikekar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Riteish Deshmukh make Eco-Friendly Ganesha

Video : रितेश देशमुखने मुलांसह बनवला टाकाऊ वस्तूंपासून गणपती, अभिनेत्याच्या लेकांनी म्हंटली आरती, व्हिडीओ पाहून होतंय कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.