Maitricha Saatbara Trailer : मैत्रीची व्याख्या ही प्रत्येकासाठी निराळी आहे, खास आहे. याच मैत्रीची अनोखी अशी परिभाषा मांडणारी ‘मैत्रीचा ७/१२’ ही वेबसीरिज लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे. बरेच दिवसांपासून या वेबसीरिजची चर्चा सुरु आहे. अशातच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘मैत्रीचा ७/१२’ या गाण्याने अनेकांच्या नजरा वळविल्या. तर यानंतर आता ‘मैत्रीचा ७/१२’ या वेबसीरिजचा ट्रेलर समोर आला आहे, आणि या ट्रेलरने साऱ्यांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण केली आहे. ‘मैत्रीचा ७/१२’ च्या ट्रेलरमधून सीरिजमधील अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. त्यामुळे अर्थात प्रेक्षकांची सीरिजबाबतची ही उत्सुकता वाढून राहिली आहे. आदित्य, दौलत, छाया, सिद्धार्थ, संचिता आणि योगिता अशा सहा जिवलगांच्या भोवती फिरणारी ही कथा आहे.
‘मैत्रीचा ७/१२’च्या ट्रेलरमध्ये सीरिजमधील सहा पात्रांची तुफान धमाल पाहायला मिळत आहे. बरेचदा आलेल्या अडचणी, एकत्र राहत असताना आलेले प्रॉब्लेम्स, आणि त्या प्रॉब्लेम्समधून काढण्यात आलेले सोल्युशन्स या सगळ्याची उत्तम गणितं या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. शिवाय प्रत्येक पात्राची यांत नव्याने ओळख केलेली पाहायला मिळतेय. एकाच घरात राहत असणाऱ्या या सहा मित्रांची अजब कहाणी कशी खुमासदार असणार आहे याची झलक ट्रेलरमध्ये दिसतेय. शिवाय ट्रेलरमध्ये काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या मैत्रीचा सातबारा या गाण्याची झलकही पाहायला मिळतेय.
आणखी वाचा – सचेत-परंपराने ठेवलं लेकाचं नाव, अर्थ आहे फारच वेगळा, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
ट्रेलरमधील आणखी एक विशेष बाब म्हणजे एकत्र राहत असताना एकमेकांमध्ये होणारे वाद हे सातबाऱ्याची कंपनी एकमेकांच्या साथीने कसे सोडवतात याची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. त्यामुळे एकूणच या सहा पात्रातील वाद, विनोद, मैत्री हे कुठवर पोहोचणार आणि काय रंगत आणणार हे येत्या काही दिवसांत कळेलच. अर्थात हा ट्रेलर पाहून सीरिजची उत्सुकता वाढली असेल यांत शंकाच नाही. येत्या २६ तारखेपासून ही वेबसीरिज इट्स मज्जा या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे.
Media One Solutions Presents & Itsmajja Original ही आगळी वेगळी वेबसीरिज ‘मैत्रीचा ७/१२’ येत्या २६ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सज्ज होत आहे. ‘मैत्रीचा ७/१२’ या नव्याकोऱ्या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा अजय पवार यांनी पेलवली आहे. तर निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी सांभाळली आहे. तसेच या सीरिजच्या क्रिएटीव्ह व प्रोजेक्ट हेड अंकिता लोखंडे या आहेत. कथा-पटकथा शुभम पाठक यांची असून संवाद ऋषिकेश डी. वाय. पवार यांचे आहेत. तर काही मोजक्या एपिसोडचे संवाद कल्पेश जगताप यांनी लिहिले आहेत. येत्या २६ फेब्रुवारीपासून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता ‘मैत्रीचा ७/१२’ ही नवीकोरी सीरिज ‘इट्स मज्जा’च्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.