‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून परीच्या भूमिकेतून घराघरांत पोहोचलेली बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ. या मालिकेमुळे मायराला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावरही मायरा बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेनंतर मायरा ‘कलर्स टीव्ही’वरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ मधून हिंदी मालिकाविश्वात काम करु लागली. यानंतर मायराने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटात ती पाहायला मिळाली. (Myra Vaikul Home)
सध्या मायरा मोठी बहीण झाल्यामुळे चर्चेत आली आहे. १५ सप्टेंबरला मायराच्या आईने एका गोंडस मुलाला जन्म दिला. ही आनंदाची बातमी मायराच्या सोशल मीडियावरुन जाहीर करण्यात आली होती. तेव्हापासून चाहते मायराच्या चिमुकल्या भावाला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. कालच मायराच्या युट्युब चॅनेलवरुन छोट्या भावाचं घरी जल्लोषात स्वागत करतानाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. यावेळी व्हिडीओमध्ये हॉस्पिटलपासून घरी मायराच्या भावाला कसं आणलं हे पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये मायराच्या घराची झलकही पाहायला मिळाली. मायराच्या घराचे सुंदर असे इंटेरिअर लक्षवेधी ठरले. तसेच हॉलमध्ये असलेल्या मोजक्याच आणि सुबक अशा वस्तूंनी आणि मायराच्या ट्रॉफीच्या खणाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. सोफा, फर्निचर यांची सुबकता खूप असून लक्षवेधी ठरतेय. तर आकर्षक असं मॅट, आकर्षक असे रंगीत पडदे हे देखील लक्षवेधी ठरत आहेत. इतकंच नव्हे तर मायराच्या बेडरुममध्ये बार्बीचे सुंदर असे चित्र कपाटावर लावण्यात आले होते. तसेच गोंडस असा बाळाचा फोटोही फ्रेम करुन लावण्यात आला होता.
आणखी वाचा – इतकी सुंदर दिसते ‘सुख म्हणजे…’फेम अभिनेत्याची लेक, सहा महिने पूर्ण होताच दाखवला चेहरा, नावही आहे खूप खास
तसेच दाराबाहेर असलेल्या २५०१ वायकुळ असं लिहिलेल्या आकर्षक नेमप्लेटने घराची ओळख करुन दिली. घरातील सुंदर आणि सुटसुटीत अशा देवघराने घराची शोभा अधिक वाढवलेली पाहायला मिळाली. तसेच मायराच्या घरातील मॉड्युलर किचनने स्वयपांकघराची शोभा वाढविली. एकूणच चिमुकल्या मायराच्या या सुंदर अशा घराने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.