mata sanman 2026 nomination : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रांत आपला आगळा ठसा निर्माण केलेल्या ‘मटा सन्मान’ कार्यक्रमाबद्दल नेहमीच उत्सुकता लागून राहिलेली असते. मराठी रंगभूमी, चित्रपट, टीव्ही, ओटीटी या क्षेत्रातील भारदस्त काम केलेल्यांचा गौरव मटा सन्मान मार्फत केला जातो. या सोहळ्याला कलाविश्वातील नामवंत सेलिब्रिटी हजेरी लावत या पुरस्कार सोहळ्याची शोभा वाढवितात. यंदाच्या म्हणजेच २०२६च्या मटा सन्मानची मानांकने जाहीर करण्यात आली आहेत. यांत ‘मीडिया वन सोल्युशन’ आणि ‘इट्स मज्जा’च्या ‘दहावी-अ’ आणि ‘पाऊस २’ या दोन वेबसीरिजने बाजी मारली आहे. एक, दोन नव्हे तर या दोन वेबसीरिजला तब्बल १२ नामांकन मिळाली आहेत. त्यामुळे ‘इट्स मज्जा’ची ओरिजिनल निर्मिती असलेल्या ‘दहावी-अ’ आणि ‘पाऊस २’ ची चर्चा आहे.
‘दहावी-अ’ ही वेबसीरिज कायमच मिलियन व्ह्यूजच्या घरात पाहिली गेली. ‘इट्स मज्जा’च्या ‘आठवी-अ’ ही सीरिज संपल्यामुळे अनेक चाहत्यांमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळाला. अशावेळी ‘इट्स मज्जा’ने ‘दहावी-अ’ या सीरिजची घोषणा केली आणि चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. शालेय जीवनाच्या शेवटच्या वर्षातील मुलांची मस्ती, त्यांच्या भावना, शाळेप्रती, मैत्रीप्रति असलेलं प्रेम या सीरिजमधून पाहणं रंजक ठरलं. तर पाऊस २ मध्ये गावाकडील रोमँटिक क्षण अनुभवायला मिळाले. या दोन्ही वेबसीरिजवरील प्रेक्षकांचं हे प्रेम आता मटा सन्मानमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे.
वेबसीरिज विभागात ‘दहावी-अ’ आणि ‘पाऊस २’ या वेबसीरिजला मिळालेली मानांकने
सर्वोत्कृष्ट वेबसीरिज
दहावी-अ
पाऊस २
सर्वोत्कृष्ट लेखन
नितीन पवार, नितीन वाडेवाले (दहावी-अ)
नितीन पवार, नितीन वाडेवाले (पाऊस २)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन
नितीन पवार (दहावी-अ)
नितीन पवार (पाऊस २)
सर्वोत्कृष्ट अभिनेता
तेजस कवार (पाऊस २)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
संयोगिता चौधरी (दहावी-अ)
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता
ओम पानस्कर (दहावी-अ)
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री
तृप्ती शेडगे (पाऊस २)




