ruhi singh whatsapp scam : ‘मस्ती ४’ या चित्रपटामध्ये दिसलेली अभिनेत्री रुही सिंगसह फसवणूक झाली आहे. कोणीतरी तिच्या नावाचा वापर करुन व्हॉट्सॲपवर डबल मिनिंगने चॅट करत आहे. तिच्या नावाने व्हॉट्सॲपच्या डबल मीनिंग चॅट्सही समोर आल्या आहेत, ज्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चॅट्स स्वतः रुही सिंगने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केल्या आहेत. तसेच हे सर्व प्रकरण बनावट असल्याचे सांगितले. या चॅट्स त्यांच्या नसून त्यांच्या नावाचा वापर करुन मोठी फसवणूक होत असल्याचं उघडकीस आणलं आहे. दरम्यान सदर प्रकरणी रुही सिंगने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
याचबरोबर रुहीने त्या व्हॉट्सॲप क्रमांकाची माहिती देऊन सर्वांनी सतर्क राहून फसवणूक करणाऱ्याला ब्लॉक करण्याचे आवाहन करण्यात केले आहे. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आणि बनावट चॅट कसे उघडकीस आले, याबाबत सविस्तर – रुही सिंगने लोकांना तिच्या नावाने व्हॉट्सॲपवर होत असलेल्या फसवणुकीबद्दल सांगितले आणि बनावट चॅट्सचाही पर्दाफाश केला. ८ फेब्रुवारी रोजी, तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ज्या बनावट नंबरद्वारे चॅट केले जात होते त्याचे तपशील शेअर केले. हा नंबर 639 584 327 आहे. हा तिचा नंबर नाही असेही तिने या स्क्रिनशॉटमध्ये लिहिले आहे. हा क्रमांक तातडीने ब्लॉक करावे, असे आवाहन तिने केले.
आणखी वाचा – प्रेमाची चर्चा असणाऱ्या अक्षया-विशालचा साखरपुडा संपन्न, दोघांच्या पारंपरिक लूकनं वेधलं लक्ष, फोटो समोर

त्यानंतर रुही सिंगने त्या फेक नंबरवरुन तिच्या नावाने केलेल्या व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आणि लिहिले, “ही मी नाही. तुम्हालाही असे हास्यास्पद आणि घृणास्पद संदेश येत असल्यास, कृपया त्यांना ब्लॉक करा. असो, मी पोलिस आणि सायबर क्राईमकडे तक्रार करत आहे”. मग तिने फसवणुकीसाठी लिहिले – “काहीतरी चांगले करा. एखाद्याची ओळख चोरणे?, त्यापेक्षा तुमचे आयुष्य जगा”.





