एखाद्याच या जगात येणं किंवा जाणं हे आपल्या हातात नसत. सामान्य माणूस असो वा कलाकार जवळची व्यक्ती गेली की होणारा त्रास हा सगळ्यांसाठीच सारखाच असतो. मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोबत अशीच एक दुःखद घटना घडली आहे. या बद्दलचं एक पोस्ट तिने सोशल मीडिया वर शेअर केली आहे. (Apurva Nemlekar Brother Death)
अपूर्वाच्या जवळची व्यक्ती असणाऱ्या तिच्या भावाने या जगाचा निरोप घेतला आहे. त्याच्या सोबतचे काही पोट पोस्ट करत तिने श्रद्धांजली वाहिली आहे. तिने पोस्टच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे. आयुष्यात कधी कधी नुकसान होते. तुला गमावणे ही माझ्या आयुष्यतील सर्वात कठीण गोष्ट आहे. तुझा निरोप घ्यायला आजही मी तयार नाही आहे. मी तुला सोडायला तयार नव्हते. पण मी बिनशर्त प्रेमावर विश्वास ठेवायला शिकले आहे कारण मृत्यूबद्दलची एक गहन गोष्ट म्हणजे प्रेम कधीही मरत नाही. काही बंध तोडता येत नाहीत. कारण जरी तुम्ही येथे शारीरिकदृष्ट्या नसला तरी तुमचे हृदय हे कायम सोबत असत कधीतरी आपण पुन्हा भेटू आणि आपण यापुढे वेळ किंवा जागेने वेगळे होणार नाही.

पण त्या दिवसापर्यंत, तू अजूनही माझ्यासोबत आहेस हे जाणून मला आराम मिळेल. तुझे हृदय माझ्या आत सुरक्षितपणे अडकले आहे. तेव्हा ही मी तुझ्यावर प्रेम केल आणि आताही मी तुझ्यावर प्रेम करतेय आणि नेहमी करेन. कायमचे माझ्या मनात, कायमच माझ्या हृदयात मी तुला ठेवीन. तो फक्त २८ वर्षाचा असून हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला असेही अपूर्वाने सांगितलं आहे. चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी देखील तिच्या भावाला श्रद्धांजली वाहिली आहे. अपूर्वाच्या भावाच्या आत्म्याला देव शांती देवो.(Apurva Nemlekar Brother Death)