शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : लग्नापूर्वी घरात सतत ही वाक्य कधीच बोलू नका, घटस्फोटापर्यंत पोहचू शकतं प्रकरण, पाहा ज्योतिषशास्त्र काय सांगतात?

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 3, 2024 | 6:54 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Marriage will not happened for saying this phrases see the details

Video : लग्नापूर्वी घरात सतत ही वाक्य कधीच बोलू नका, घटस्फोटापर्यंत पोहचू शकतं प्रकरण, पाहा ज्योतिषशास्त्र काय सांगतात?

कुटुंबव्यवस्था हा आजही भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि लग्न हा या कुटुंबव्यवस्थेचा कणा. म्हणूनच आजच्या वेगवान जगाशी जुळवून घेताना आजची तरुण पिढी लग्नव्यवस्थेबद्दल खूपच विचारपूर्वक निर्णय घेताना दिसून येते. आजची तरुण पिढी ही त्यांच्या वैयक्तिक किंवा वैवाहीक आयुष्याबाबतचे निर्णय हे त्यांच्या करिअरच्या दृष्टीने घेतात.

प्रत्येकाचं लग्न झालंच पाहिजे, ते वेळच्या वेळी झालं पाहिजे आणि ते यशस्वीही झालं पाहिजे, हा एकमेव समज बाळगत याआधीच्या पिढय़ा जगल्या. पण, आताच्या पिढीबाबत हळूहळू चित्र पालटताना दिसत आहे.  नव्या पिढीत लग्न जुळण्याच्या, जुळवण्याच्या, करण्याच्या किंवा त्या निभावण्याच्या पद्धती हळूहळू बदलत आहेत. पण लग्न करण्याच्या आधी काय केले पाहिजे. याबद्दल विशाल तरटे यांनी मार्गदर्शन केले आहे. विशाल हे ज्योतिष असून त्यांनी लग्न करण्याच्या आधी काय करु नये? किंवा काय केल्याने लग्न होत नाही, याबद्दल सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Vishal Tarte (@akssyprbhu_)

आणखी वाचा – Video : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीने खरेदी केली महागडी कार, शोरुममध्येच पूजा केली अन्…; व्हिडीओ व्हायरल

यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे की, “काही मुलंमुली मला लग्न करायचं नाही. मी लग्न करणार नाही असं वारंवार म्हणतात. घरातल्या काही कारणांमुळे किंवा घरातील काही व्यक्तींना व्यसन वगैरे असेल किंवा घरात काही भांडण किंवा कटकटी होत असतील, तर ते लोक कंटाळून किंवा चिडून मला लग्न नाही करायचं असं वारंवार म्हणतात. त्यामुळे त्यांच्या मनात लग्नाविषयी द्वेष किंवा राग निर्माण होतो. याच गोष्टी तुमच्या घरातही होत असतील तर त्या आपल्या तोंडाने म्हणू नका. कारण त्या गोष्टी हळूहळू खऱ्या व्हायला लागतात किंवा लग्न झाल्यानंतर लग्नामध्ये अडचणी येतात. लग्न झाल्यानंतर कुटुंबामध्ये काही समस्या येतात. पती-पत्नींमध्ये खूप समस्या निर्माण होतात.

आणखी वाचा – ‘माहेरची साडी’च्या रिमेकमध्ये कोणती सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री साकारेल मुख्य भूमिका?, अलका कुबल म्हणाल्या, “सोनाली, मुक्ता, अमृता या…”

यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “बरेचजण आपल्या करिअरला प्रमाणापेक्षा अधिक महत्त्व देतात. त्यामुळे नातेसंबंध चांगले राहत नाहीत आई-वडिलांबरोबरचे संबंधदेखील खराब होतात. करिअर, प्रॉपर्टी, घर यामध्ये व्यस्त झाल्याने लग्नाचे वय निघून जाते. करिअर हे आयुष्यात कधीही करता येऊ शकते. पण लग्नाचे वय निघून गेले की, ते परत येत नाही. निसर्ग हा कुणासाठीही थांबत नाही. तुमचे वयही तुमच्यासाठी थांबणार नाही”.            

Tags: Marriage Marathi NewsViral Video Marathi NewsViral Video News
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
04 may 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

शनिदेवाच्या कृपेमुळे मिथुन, कन्या व वृश्चिक राशींच्या लोकांची होणार आर्थिक भरभराट, तुमच्या नशिबात नेमकं काय?, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.