गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन हे जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली. गेले काही दिवस त्यांच्या लग्नाच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. गेले काही दिवस मुग्धा-प्रथमेश त्यांच्या लग्नाआधीच्या विधींचे खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर करत होते. त्यामुळे हे दोघे कधी लग्न करणार? याचे अनेकजण वाट पाहत होते. अशातच या जोडीने काल चिपळूणमध्ये एकमेकांबरोबर लग्नबंधनात अडकली. (Juilee Joglekar And Rohit Raut On Instagram)
मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नाला जवळचे नातलग, आत्पेष्ट व कुटुंबीयांनी खास हजेरी लावली होती. त्याचबरोबर त्यांच्या मित्रपरिवारानेदेखील उपस्थिती लावत या लग्नसोहळ्याला खास उपस्थिती लावत रंगत आणली. मुग्धा-प्रथमेश यांच्यावर अक्षता पडत असताना त्यांच्या मित्रमैत्रीणींनी एकच जल्लोष केल्याचे अनेक व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले. यावेळी रोहित-जुईलीनेही मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला खास लूकमध्ये उपस्थिती लावली होती.
रोहित-जुईलीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नाचे काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. यात एका व्हिडीओमध्ये रोहित जुईलीची साडी सावरत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये त्यांनी आरशात उभं राहून फोटो काढला आहे. तर पुढच्या काही फोटोंमध्ये त्यांनी लग्नातले काही फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर एका फोटोमध्ये त्यांनी मुग्धा-प्रथमेश यांच्या “आमचं ठरलंय” नावाचे पोस्टर हातात पकडूनदेखील फोटो काढला आहे.
दरम्यान, रोहित-जुईलीने शेअर केलेल्या या फोटो व व्हिडीओखाली त्यांच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. “सुंदर, छान, अप्रतिम, एकदम भारी, दोघे खूप छान दिसत आहात, माझी आवडती जोडी” अशा अनेक कमेंट्स करत या पोस्टला नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. तर पहिल्या फोटोत जुईलीच्या मोबाइलच्या कव्हरमध्ये ५००ची नोट बघून एकाने “मला मात्र ५००ची नोट दिसली” अशी कमेंट केली आहे. त्यामुळे इतर सर्व कमेंट्सपैकी या कमेंटने चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे.