‘राजा राणीची ग जोडी’ या मालिकेतून शिवानी सोनार ही अभिनेत्री घराघरात पोहोचली. आता लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे. ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता अंबर गणपुळेबरोबर ती लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्याही घरी लगीनघाई सुरु असल्याचे बघायला मिळाले. अशातच अंबरच्या हळदीचे काही फोटो समोर आले होते. या हळदी स्पेशल फोटोंमध्ये अंबरने पिवळ्या रंगाचा सदरा, पांढरा पायजमा आणि डोक्यावर टोपी असा लूक केला आहे. कुटुंबातील सदस्य अंबरला हळद लावताना दिसत आहेत. यावेळी अभिनेत्याचा आनंद त्याच्या चेहरावर पाहायला मिळत आहे. अशातच आता शिवानीचा मेहंदीसोहळादेखील पार पडला आहे. (shivani sonar mehndi ceremony)
काल म्हणजे १८ जानेवारी रोजी शिवानीच्या हातावर अंबरच्या नावाची मेहंदी रंगली आहे. हा मेहंदी सोहळा अत्यंत घरगुती पद्धतीने करण्यात आला आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये शिवानी सुंदर असा लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच साधासा मेकअप तिच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. शिवानी यामध्ये खूपच खुश दिसून येत आहे. दरम्यान काही मेहंदीच्या काही फोटोंमध्ये तिच्याबरोबर अंबरदेखील दिसून येत आहे. दोघंही खूप खुश दिसत आहेत. तसेच त्यांचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अंबर व शिवानी मेहंदीदरम्याने नाचताना दिसत आहेत. त्यांचे हे फोटो व व्हिडीओ त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शिवानी व अंबरच्या लग्नाआधीचे विधी दिमाखदार पार पडत आहेत. त्यामुळे आता त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी शिवानीचा ‘अष्टवर’ विधी पार पडला. हा विधी करतानाचे शिवानीचे काही फोटोदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले होते. यामध्ये शिवानी सुंदर अशी लाल-गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तसेच कपाळी मुंडावळ्यादेखील होत्या. या लूकमध्ये शिवानी खूपच सुंदर दिसत होती.
दरम्यान, ‘रंग माझा वेगळा’, ‘दुर्वा’, ‘लोकमान्य’ या मालिकांमधून अंबर गणपुळेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तर ‘राजा राणीची गं जोडी’ आणि ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकांमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. काही दिवसांपूर्वीच ‘रंग माझा वेगळा’च्या संपूर्ण टीमने शिवानी व अंबर यांच्या केळवण साजरे केले होते.