बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ताचा अपघात, गाडी चालवताना झोप लागली अन्…; अभिनेत्रीचं मोठं नुकसान

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 2, 2025 | 5:58 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Premachi Goshta fame Swarda Thigales car accident

‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ताचा अपघात, गाडी चालवताना झोप लागली अन्...; अभिनेत्रीचं मोठं नुकसान

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत पुढे आहे. या मालिकेतील मुक्ता या पात्राला तर प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. अभिनेत्री स्वरदा ठिगळे मुक्ता पात्र साकारत आहे. तिला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. यशाच्या शिखरावर असताना स्वरदाबरोबर एक विचित्र अपघात घडला. याबाबतच तिने व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. तब्बल सलग २४ तास शूट करुन घरी परतताना स्वरदाच्या कारचा अपघात झाला. यामध्ये तिच्या गाडीचं खूप नुकसान झालं. सुदैवाने ती वाचली. जीवावर बेतणाऱ्या अपघातातून स्वरदा थोडक्यात बचावली. याच घटनेने तिला मोठा धक्का बसला आहे. तिने या अपघाताबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. (Premachi Goshta fame Swarda Thigales car accident)

व्हिडीओद्वारे स्वरदाने तिच्या गाडीची हालत दाखवली. तसेच बरंच नुकसान झाल्याचंही दिसून आलं. स्वरदा म्हणाली, “आता पहाटेचे सहा वाजले आहेत. पहाटे ५.३० वाजता हा किस्सा माझ्याबरोबर झाला आहे. गाडीची हेडलाइट गेली आहे, चाक गेलं आहे, गाडीचं दार आतमध्ये घुसलं आहे. आता तर माझ्या गाडीचा दरवाजा उघडतही नाही. दुसऱ्या बाजूच्या दरवाजाने मी गाडीमधून खाली उतरले”.

आणखी वाचा – “सी-सेक्शन म्हणजे आराम”, सुनिल शेट्टींच्या वक्तव्यावर भडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “अनुभवलं नाही मग बोलले कसे?”

View this post on Instagram

A post shared by SWARDA THIGALE (@swardathigale9)

“पूर्णपणे माझ्या गाडीचं नुकसान झालं आहे. काल म्हणजे सात ते दहा वाजेपर्यंत आमची शिफ्ट होती. स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका मी करते. याबाबत तुम्हा सगळ्यांना माहितच असेल. काल सकाळी सातच्या शिफ्टला माझं काम सुरु झालं. ते आज पहाटे पाच वाजता माझं पॅकअप झालं आहे. मी एकटी ही गाडी चालवत घरी आले. चांदीवली स्टुडिओ ते मड अशी मी ही गाडी चालवली. मला झोप लागली. पेंगत होते. कारण मी प्रचंड थकली आहे. कारण आदल्या दिवशी सकाळी सात ते दुसऱ्या दिवशी पाच वाजेपर्यंत शूटच करत होते. त्यामुळे माझं हे खूप मोठं नुकसान झालेलं आहे”.

आणखी वाचा – ‘हिरामंडी’ फेम अभिनेत्री झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म, कुटुंबात जंगी सेलिब्रेशन

“खूप महागात पडलेलं आहे. महासंगम आणि आमचं शूटच मला महागात पडलं. आता हा कितीचा फटका बसणार आहे? याबाबत मला कल्पना नाही. ही गोष्ट माझ्या जीवावर बेतली नाही यासाठी मी स्वतःला नशिबवान समजते. झोप लागून गाडी कुठे धडकली नाही आणि माझ्या जीवावर काही आलं नाही हेच मला आता थोडं बरं वाटतंय. मला माझ्या सहकलाकारांनाही ही विनंती आहे की, तुम्ही असं काही करु नका. कारण मला आता या प्रसंगावरुन कळालं आहे की, भविष्यात मला काय करायचं नाही. पण यामधून तुम्ही तरी काहीतरी शिका. तुमच्या जीवाशी तुम्ही खेळू नका. काम होत राहिल. पण तुमचा जीव महत्त्वाचा आहे. हे एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे”. स्वरदाला काही दुखापत झाली नाही हे एवढंच काय ते तिचं नशिब.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
seema kapoor torchered by own mother

आईकडून मारहाण, टॉर्चर अन् हाल; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला वाईट काळ, जन्मदातीच वैरी ठरली तेव्हा...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.