कलाकारांचा चित्रपट, मालिका यांव्यतिरि्त प्रेक्षकांच्यामनात घर करण्याचा मार्ग म्हणजे फोटोशूट. अनेक अभिनेते, अभिनेत्री नेहमी वेगवेगळे आणि हटके फोटो शूट करत असतात. कधी त्यांचा लूक चर्चेत ठरतो, कधी पोज तर कधी त्यांची अदा.स्विम सूट मध्ये असच एक हटके फोटो शूट केलं आहे अभिनेत्री प्रार्थना बेहरेने. निळ्या, पाढंऱ्या स्विमिंग सूट मध्ये प्रार्थनाच्या अदा चाहत्यांसोबतच कलाकारांना ही भुरळ पाडताना दिसत आहेत. या पोस्टच्या कॅपशन मध्ये प्रार्थनाने ‘आनंद म्हणजे हाच असावा’ असं कॅपशन देखील लिहिलंय.(Prarthana Behere Shreyas Talpade)
प्रार्थना ने केलेल्या पोस्ट वर अभिनेता श्रेयस तळपदे ने केलेली कमेंट सुध्दा चांगलीच चर्चेत ठरते. प्रार्थना च्या फोटोवर श्रेयस ने ‘Flower samje kya…..Fire hai madam’ अशी हटके कमेंट करत प्रार्थनेच्या सौंदर्याचं कौतुक देखील केलं आहे. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील आणि इतर कलाकारांनी देखील प्रार्थनाच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

तर मालिकेत तिच्या सॊबत काम केलेलीच अभिनेत्री स्वाती ने कमेंट करत ‘ माझ् तर फक्त तुझ्या smile कडे लक्ष गेलं यार.. लगेच आपले shoot days आठवले…..shooting ला सकाळी आल्या आल्या hello करणारी गोड, सुंदर, प्रेमळ,निर्मळ मुलगी…तू तर सगळ्यात गोड दिसतेस यार…love u r personality always…’ प्रार्थनाच्या फोटोंचं कौतुक करत शूटच्या जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे. सोबतच हास्यजत्रा फेम रसिका वेंगुर्लेकर, अभिनेत्री पूजा सावंत यांनी देखील कमेंट्स केल्या आहेत.
हे देखील वाचा – “नाहीतर तुला प्रयोगाला यायला मला बंदी घालावी लागेल” या कारणामुळे काशिनाथ घाणेकर यांना दादांनी दिला होता दम
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील श्रेयस आणि प्रार्थना ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. मालिके नंतर प्रार्थना लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका पुन्हा सुरु व्हावी या साठी प्रेक्षक आग्रही दिसत आहेत.(Prarthana Behere Shreyas Talpade)