साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर’ सिनेमा गेल्या १० ऑगस्टला जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला. सिनेमाला प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसांपासून जोरदार प्रतिसाद मिळत होता. दक्षिणेतील प्रेक्षकांसह जगभरातील प्रेक्षकांनीही सिनेमाला व रजनीकांतच्या अभिनयाला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. सिनेमागृहांमध्ये जोरदार हिट झाल्यानंतर आता ‘जेलर’ ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवण्यास सज्ज होणार आहे. (Jailer OTT Release)
रजनीकांतचा ‘जेलर’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ३०० कोटींहून अधिक कमाई केली असून अनेक ठिकाणी या सिनेमाने शोज अजूनही सुरु आहेत. दरम्यान, नेल्सन दिग्दर्शित हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबरला ‘अमेझॉन प्राईम व्हिडिओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड व मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. खुद्द अमेझॉन प्राईमने सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली आहे. (Jailer OTT Release)
हे देखील वाचा – “माझ्या आईच्या चारित्र्यावर तेव्हा…”, काळ्या रंगावरुन हिणावणाऱ्यांना अतिशा नाईकचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “गोरं होण्यासाठी…”
नेल्सन दिग्दर्शित या चित्रपटात रजनीकांत यांनी जेलर टायगर मुथुवेल पांडियनची भूमिका साकारली आहे. तर मोहनलाल, शिवा राजकुमार, जॅकी श्रॉफ, राम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, योगी बाबू यांनीदेखील मुख्य भूमिका साकारली आहे. सिनेमाची कथा एका निवृत्त जेलरभोवती फिरतो, जो आपल्या मुलाच्या मारेकऱ्यांचा शोध घेतो. सिनेमातील अभिनेत्याचा अंदाज व दमदार ऍक्शन सीन्सचे सिनेप्रेमी दिवाने झाले आहे.
हे देखील वाचा – पारंपरिक लूक, साडी अन्…; अमृता देशमुख व प्रसाद जवादेची लगीनघाई, पहिल्या केळवणाचा फोटो केला शेअर
सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरु असताना काही दिवसांपूर्वीच यातील एक सीन वादात अडकला होता. खरं तर, सिनेमाच्या त्या सीनमध्ये एक कॉन्ट्रॅक्ट किलर आरसीबीच्या जर्सीत दाखवण्यात आला होता. दरम्यान, हे प्रकरण हायकोर्टात गेल्यानंतर कोर्टाने निर्मात्यांना हा सीन काढून टाकण्याचे आदेश दिले होते.