शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रथमेश परबनंतर सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक समीर विद्वांसचा साखरपुडा सोहळा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 15, 2024 | 10:50 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Marathi director Sameer vidwans got engaged with juilee sonalkar photos viral on social media

प्रथमेश परबनंतर सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक समीर विद्वांसचा साखरपुडा सोहळा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मराठी मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरु आहे. मराठीतील अनेक कलाकार मंडळी आपल्या जोडीदारांबरोबर विवाहबंधनात अडकत आहेत. नुकतेच शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावारे हे दोघे विवाहबंधनात अडकले. त्याचबरोबर अभिनेता प्रथमेश परबचा गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरबरोबर नुकताच साखरपुडा सोहळा संपन्न झाला. अशातच आणखी एका मराठमोळ्या दिग्दर्शकाचा ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधत साखरपुडा पार पडला.

प्रथमेश परबनंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी साखरपुडा केला आहे. साखरपुड्याचे काही खास फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. जुईली सोनलकरबरोबर समीर यांचा साखरपुडा पार पडला असून या साखरपुडा सोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sameer Vidwans (@sameervidwans)

समीर-जुईली हे दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांबरोबर काम करत आहेत. जुईलीदेखील गेली अनेक वर्ष सिनेक्षेत्रात कार्यरत आहे. दोघांचे अनेक एकत्र फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. अनेक वर्षांची मैत्री आणि प्रेम, यानंतर अखेर दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नुकताच साखरपुडा करत या दोघांनी त्यांच्या आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा –  वेड प्रेमाचे! प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकरचा थाटामाटात पार पडला साखरपुडा, स्टेजवरच शाहरुख स्टाईल पोज दिली अन्…

समीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे साखरपुड्याचे खास फोटो शेअर करत “Hitched” आणि “we decided on forever” म्हणजेच आम्ही आयुष्यभरासाठी एकमेकांबरोबर अडकलो आहोत असं म्हटलं आहे. समीरने शेअर केलेल्या या फोटोवर बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीसह श्रेया बुगडे, मयुरी देशमुख, अनघा अतुल, जयवंत वाडकर, आशय कुलकर्णी, सुयश टिळक, ऋषी सक्सेना, सायली संजीव, मेघा धाडे, वैदही परशुरामी यांसह अनेक कलाकारांनी कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – डिनर डेट, रोमॅंटिक अंदाज अन्..; लग्नानंतर प्रथमेश व मुग्धाने साजरा केला पहिला व्हॅलेंटाईन डे, फोटो व्हायरल

दरम्यान समीर यांनी आजवर अनेक लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. ‘टाइम प्लिज’, ‘धुरळा’, ‘वाय झेड’, ‘डबल सीट’, ‘आनंदी गोपाळ’ सारख्या अनेक मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. तसेच कियारा अडवाणी व कार्तिक आर्यन यांची मुख्य भूमिका असलेला ‘सत्य प्रेम की कथा’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. 

Tags: समीर विद्वांस जुईली सोनलकर साखरपुडामनोरंजन बातमीमराठी कलाकारमराठी बातमीमराठी दिग्दर्शकजुईली सोनलकरentertainment newsJuilee Sonalkarmarathi actorsmarathi directorMarathi Entertainment Newsसमीर विद्वांसMarathi newsSameer VidwansSameer Vidwans Juili Sonalkar Sakhpuda
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Aditya narayan on concert

चाहत्याला मारहाण, मोबाईल फेकून दिल्यानंतरही आदित्य नारायण स्वतःची चूक मान्य करेना, स्पष्टीकरण देत म्हणाला, "मी देवालाच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.