अभिनेता गश्मीर महाजनी सध्या विशेष चर्चेत आहे. कारण गश्मीरचे वडील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या अचानक झालेल्या निधनाच्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूला अनेकांनी गश्मीरला जबाबदार ठरवले आहे. दरम्यान काहींनी गश्मीरची बाजू घेत त्याला सांभाळून घेतल्याचं ही समोर आलं आहे. (Gashmeer Mahajani Answers to fans)
वडिलांच्या निधनानंतर गश्मीर विशेष चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा गश्मीर सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. गश्मीरने नुकतंच चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन ठेवले होते, ज्यात त्याने ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देण्यासह चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली आहे. दरम्यान एका चाहत्याने त्याला, या कठीण दिवसात मराठी चित्रपट सृष्टीने तुम्हाला साथ दिली का? असा प्रश्न गश्मीरला विचारला. यावर गश्मीरने उत्तर देत म्हटलं, “होय काही सॉर्टेड आणि कुशल कलाकारांनी मला कॉल केला आणि पाठिंबा दिला. मुख्यत्वे प्रवीण तरडे, रितेश देशमुख, मृण्मयी देशपांडे यांनी सपोर्ट केला. ते रत्न आहेत आणि मी त्यांना कधीच विसरणार नाही.”
पाहा इंडस्ट्रीतल्या सपोर्टबद्दल काय म्हणाला गश्मीर (Gashmeer Mahajani Answers to fans)
गश्मीरच्या या उत्तराने साऱ्यांची बोलती बंद केली आहे. मराठी मनोरंजन सृष्टी कायमच एकमेकांना सपोर्ट करण्यात अग्रस्थानी असते. जितके हे कलाकार एखाद्याचा सुखात भाग घेतात तितकेच ते दुखातही त्या व्यक्तीच्या सोबत असतात. गश्मीरच्या दुःखाच्या काळात त्याची प्रवीण तरडे, रितेश देशमुख, मृण्मयी देशपांडे यांनी विचारपूस केली असल्याचं समोर आलं आहे. याआधीही गश्मीरच्या स्ट्रगल पिरेडमध्ये त्याच्या आयुष्याला प्रवीण तरडे यांनी कलाटणी दिली होती, याबद्दल गश्मीरने बऱ्याच मुलाखतींमध्ये भाष्य ही केलं आहे.
हे देखील वाचा – वडिलांच्या निधनानंतर ट्रोल करणाऱ्यावर भडकला गश्मीर महाजनी, म्हणाला,”१३ दिवसात मी माझ्या…”
गश्मीर फक्त १५ वर्षांचा होता त्यावेळी गश्मीरने स्वमेहनतीवर स्वतःची डान्स अकॅडमी सुरु केली आणि वयाच्या २१व्या वर्षी स्वबळावर घरावर आलेलं कर्ज फेडलं. या त्याच्या संघर्षाच्या काळात त्याला कुटुंबासोबतच सिनेमाविश्वातल्या एका दिग्गज व्यक्तीची साथ लाभली. ही दिग्गज व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेते प्रवीण तरडे होय. प्रवीण तरडे यांनी गश्मीरच्या जीवनाला टर्निंग पॉईंट मिळवून दिला, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
