Nitin Borkar Death: मराठी मनोरंजनविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन बोरकर यांचे निधन झाले आहे. १८ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डी. वाय. पाटील या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते ब्रेन स्ट्रोक या आजाराशी झुंज देत होते. अखेर त्यांची हे झुंज अपयशी ठरली. तसेच त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे. नितीन यांनी ४० हून अधिक चित्रपटांसाठी कला दिग्दर्शन केलं होतं.
काही महिन्यांपूर्वी नितीन बोरकर यांना ब्रेन स्ट्रोकमुळे डी. वाय. पाटील या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले. नितीन बोरकर यांनी अनेक वर्ष मराठी इंडस्ट्रीत काम केलं. नितीन यांनी आतापर्यंत जवळपास ४० हून अधिक सिनेमांचं कला दिग्दर्शन केलं आहे. ‘बॉईज 3’ तसेच ‘ती आणि ती’ या चित्रपटातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ‘राजवाडे अँड सन्स’ आणि ‘दगडाबाईची चाळ’ यांसारख्या चित्रपटांमधूनही त्यांची कला दिसून आली. ‘मी वसंतराव’ या चरित्रात्मक चित्रपटातही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. नितीन बोरकर यांनी रंगभूमीवर देखील आपलं योगदान दिलं. (Nitin Borkar Death)



