Neha Kakkar Cryptic Post: लोकप्रिय गायिका नेहा कक्कर नेहमीच तिच्या गाण्यांमुळे चर्चेत असेलेली पाहायला मिळते. मात्र यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली. नेहा कक्करने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे सध्या ती चर्चेचा विषय ठरली आहे. तिने सोशल मीडियावर एक गूढ पोस्ट केली आहे. यामध्ये ती तिच्या सर्व जबाबदाऱ्या, नाती, काम आणि इतर सर्व गोष्टींपासून ब्रेक घेत असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान तिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून नेहाचे चाहते प्रचंड चिंतेत पडले आहेत.
नेहाने पोस्ट शेअर करत म्हटलं की, “आत्ता मला सर्व जबाबदाऱ्या, नाती, काम आणि जे काही शक्य आहे त्यापासून ब्रेक घ्यायचा आहे. मी परत येईन की नाही, हे देखील माहीत नाही. धन्यवाद.” या पोस्टसोबत तिने हात जोडलेला इमोजीही शेअर केला होता. दुसऱ्या स्टोरीत तिने म्हटलं, “मी पापाराझी आणि चाहत्यांना विनंती करते की माझे व्हिडीओ किंवा फोटो काढू नका. माझ्या खासगी आयुष्याचा आदर करा आणि मला मोकळेपणाने जगू द्या. माझ्या शांततेसाठी ही किमान गोष्ट तुम्ही करू शकता.” इतकंच नव्हे तर तिने अवघ्या ३० मिनिटांत या दोन्ही पोस्ट डिलीट केल्यात आहेत. मात्र याचे स्क्रीनशॉट्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Neha Kakkar Cryptic Post)
नेहाने सोशल मीडिया अणि या लाईमलाइटपासून दूर राहण्याचा नेमका निर्णय का घेतला, याचं स्पष्ट कारण समोर आलेलं नसले तरी ‘कैंडी शॉप’वर झालेली टीका यामागे कारणीभूत असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Neha Kakkar Cryptic Post)
आणखी वाचा: मराठी कलाविश्वावर शोककळा; सुप्रसिद्ध कलादिग्दर्शकाचे निधन, ब्रेनस्ट्रोक झाला आणि…



