शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तर आता गुंड किंवा चोर असतो”, अनंत जोग यांचा स्वत:विषयी धक्कादायक खुलासा, म्हणाले, “माझ्या हातून खून…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 27, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi and Hindi actor Anant Jog commented on himself saying that if he is not an actor then he will be a gangster or a thief.

"तर आता गुंड किंवा चोर असतो", अनंत जोग यांचं स्वत:विषयी भाष्य, जाणून घ्या...

मराठी सिनेसृष्टीतील खतरनाक खलनायक म्हणून अभिनेते अनंत जोग यांना ओळखले जाते. त्यांनी आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. खलनायकच्या अनेक भूमिका करुनही प्रेक्षकांची त्यांना नेहमीच पसंती मिळाली. आपल्या अभिनयाने हिंदीसह मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अनंत जोग जर नट नसते तर कदाचित चोर किंवा गुंड असते असं त्यांनी स्वत:चं म्हटलं आहे. अनंत जोग यांनी नुकतीच स्मृतीगंध या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांना “तुम्ही जर नट नसतात तर काय असता?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अनंत जोग यांनी असं उत्तर दिलं की, “नट नसतो तर मी कदाचित गुंड किंवा भुरटा चोर असतो. याचा एक किस्सा आहे की, मी एकदा माझ्या वडिलांबरोबर ताज हॉटेलमध्ये कोणत्या तरी फंक्शनला गेलो होतो. तर तिथल्या टॉयलेटमध्ये मला अ‍ॅश्ट्रे (AshTray) दिसला. तर मी म्हटलं काय मूर्ख लोक आहेत, इतका चांगला अ‍ॅश्ट्रे इथे का ठेवला? तर मी तो खिशात घातला आणि घरी गेलो”.

यापुढे अनंत जोग असं म्हणाले की, “घरी जाऊन आईने विचारलं, हे कुणी आणलं?. मी म्हटलं मी आणलं. तर तिने ते वडिलांना सांगितलं. आज आणखी एक लग्न आहे आपण पुन्हा जाऊन आणि याचसारखा आणकी एक अ‍ॅश्ट्रे आणू. तिथे गेल्यानंतर मला वाटलं होतं की, लग्न असेल पण तिथे तसं काहीच नव्हतं. तर वडिलांनी तिथल्या मॅनेजरला सांगितले की, माझ्या मुलाने तुमच्या हॉटेलमधून हा अ‍ॅश्ट्रे चोरला आहे. तर याला काय शिक्षा असेल ती द्या. नंतर वडिलांनी मला तिथल्या सर्व लोकांची माफी मागून असं मी पुन्हा कधी करणार नाही असं म्हणायला सांगितलं आणि मी असं काही केलं नाही तर मी इथून जाताना एकटा जाणार, तू कसं यायचं ते बघ असं म्हटलं. तेव्हा मी आठवी किंवा नववीमध्ये होतो”.

View this post on Instagram

A post shared by kshitee jog | क्षिती जोग (@kshiteejog)

आणखी वाचा – Tula Shikvin Changalach Dhada : अक्षराने उधळला सासूच्या लग्नाचा डाव, भुवनेश्वरीने हात जोडत मागितली माफी, चारुहास-अधिपती माफ करणार का?

यापुढे त्यांनी आणखी एक किस्सा सांगितला. याबद्दल ते असं म्हणाले की, “एकदा मी एका बस कंडक्टरला मारलं होतं. तर त्यांनी बस थेट पोलिस स्टेशनला नेली. माझ्याबरोबर तेव्हा माझे दोन मित्रही होते. ते घाबरलेले. तेव्हा माझे दूरचे एक काका कमिशनर होते. तेव्हा मोबाइल नव्हते. त्यामुळे मी वडिलांना सांगितलं. त्यानंतर वडिलांचे आणि पोलिसांचे बोलणे झाले. मग मी पोलिसांना विचारले की वडील काय म्हणाले, तर माझ्या वडिलांनी पोलिसांना सांगितले होते की, तुम्ही त्याला आणखी आठ दिवस तुरुंगात ठेवा. त्याची तिच लायकी आहे आणि तुम्ही तसं नाही केलं तर मी तुमच्या वरिष्ठांना तुमची तक्रार करेन”.

आणखी वाचा – उर्मिला कोठारेची लेकीसह इंटरनॅशनल ट्रीप, ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष, म्हणाली, “माझी राजकुमारी…”

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “मग मी माझ्या मित्रांच्या वडिलांना फोन केला जे वकील होते. मग आम्ही आमच्या त्या मित्राच्या वडिलांच्या मदतीने सुटलो. तर या दोन मुख्य घटना घडल्या नसत्या तर मी नट नसतो. मी कुणी तरी गुंड झालो असतो आणि माझा खून झाला असता किंवा माझ्या हातून काही खून झाले असते. माझा स्वभाव बघता त्याची शक्यता जास्त आहे”. दरम्यान अनंत जोग यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी ‘भुताचा भाऊ’, ‘हस्ती’, ‘हेलो नंदन’, ‘साथी’, ‘कांची’, ‘पुरुष’, ‘जनम’, ‘मधहोष’, ‘विजयपथ’, ‘नो एण्ट्री’, ‘सरकार’ ‘झिम्मा’ ‘सिंघम’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. याशिवाय त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमधूनही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Tags: anant jogAnant Jog Marathi Newsmarathi actor
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
28 November 2024 Thursday daily horoscope Due to Saubhagya Yoga, happiness and prosperity will come in the lives of Aries Cancer and Pisces people.

28 November Horoscope : सौभाग्य योगामुळे मेष कर्क व मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुखसमृद्धी, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.