शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वर्षा उसगांवकरांची ‘बिग बॉस’मराठी मध्ये एण्ट्री?, ‘सुख म्हणजे…’ सोडल्यानंतर चर्चांना उधाण, प्रेक्षक म्हणाले…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 20, 2024 | 12:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Varsha Usgaonkar Bigg Boss Marathi

वर्षा उसगांवकरांची 'बिग बॉस'मराठी मध्ये एण्ट्री?, 'सुख म्हणजे…' सोडल्यानंतर चर्चांना उधाण, प्रेक्षक म्हणाले…

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. ही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षक या मालिकेच्या प्रेमात होते. कालांतराने बदललेल्या या कथानकाने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. मालिकेतील सर्वच कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. जयदीप-गौरी, नित्या-अधिराज या पात्रांबरोबर माई हे पात्रही महत्त्वपूर्ण होतं. अशातच या पात्राने नुकताच मालिकेचा निरोप घेतला असल्याचं समोर आलं आहे. अलीकडच्या एपिसोडमध्ये माईचा दुर्दैवी अंत दाखवण्यात आला. (Varsha Usgaonkar Bigg Boss Marathi)

मालिकेत माई हे पात्र ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर साकारत आहे. वर्षा यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून एक्झिट घेतली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ त्यांनी त्यांच्या ऑफिशिअल पेजवरुन शेअर केला आहे. मालिका सोडल्यानंतर वर्षा ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार का?, अशी सध्या चर्चा सुरु झाली आहे.

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेता कोकणात घेत आहे भातशेतीचा अनुभव, पावसात भिजत शेअर केला व्हिडीओ, म्हणाला, “प्रत्यक्ष शेतात…”

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन येत्या २८ जुलैपासून सुरु होणार आहे. २८ तारखेला या शोचा ग्रँड प्रीमियर होणार असून त्यानंतर १०० दिवस ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात स्पर्धकांचा खेळ सुरु होईल. यंदाचा हा नवा सिझन अभिनेता रितेश देशमुख होस्ट करणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरुन वर्षा यांच्या मालिकेच्या एक्झिटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टखाली नेटकऱ्यांनी कमेंट करत ‘बिग बॉस’ मराठीमध्ये त्या दिसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

आणखी वाचा – आता विषय हार्ड व्हनार! ‘तुला शिकवीन…’ फेम अधिपती-अक्षरा परदेशात करत आहेत एन्जॉय, व्हिडीओ चर्चेत

“माई आता बिग बॉस मराठी सीझन ५ मध्ये दिसतील”, “तुम्ही आता BBM5 मध्ये चालल्या आहात ना?”, “‘बिग बॉस’मध्ये तुमचं स्वागत आहे”, “शालिनीचा शेवट होताना माई तुम्ही पाहिजे होता पण जाऊद्या आता आम्ही ‘बिग बॉस’मराठीमध्ये पाहू”, अशा अनेक कमेंट प्रेक्षकांनी करत वर्षा उसगांवकर ‘बिग बॉस’मराठीमध्ये दिसणार असल्याचं म्हटलं आहे.

Tags: bigg boss marathi 5marathi actressvarsha usgaonkarVarsha Usgaonkar Bigg Boss Marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Jaya Bachchan On Aishwarya Rai

ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान जया बच्चन यांचा जुना व्हिडीओ व्हायरल, सूनेबद्दल केलं होतं भाष्य, म्हणाल्या, "मागे उभी राहून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.