मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, पारंपरिक लग्नविधींना सुरुवात, फोटो समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 3, 2026 | 2:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sakshi Mahajan Marriage Ritual Started

मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, पारंपरिक लग्नविधींना सुरुवात

Sakshi Mahajan Marriage Ritual Started : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या सगळीकडे लग्नसाराय सुरु असलेली पाहायला मिळत आहे. तर काही दिवसांपूर्वीच अभिनेता सिद्धार्थ खिरीड लग्नबंधनात अडकला. तर ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेतील ऋत्विक तळवलकर देखील लग्नबेडीत अडकला. अशातच आता आणखी एका कलाकार जोडीचं नाव या यादीमध्ये सामील होणार आहे. ती कलाकार जोडी म्हणजे अभिनेत्री साक्षी महाजन आणि अभिनेता अथर्व कर्वे.

आणखी वाचा: ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचं ठरलं लग्न, ‘हा’ आहे अपूर्वाचा होणार नवरा; ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

तर साक्षी महाजन आणि अथर्व कर्वे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असून, आता त्यांच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे.साक्षीच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. त्याबद्दलची एक सोशल मीडिया पोस्टसुद्धा तिने शेअर केली आहे. अभिनेत्रीच्या घरी घाणा आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याचा फोटो साक्षीनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. तर अथर्व कर्वेचं घरसुद्धा लग्नासाठी सजलं आहे. त्यानंसुद्धा घराला केलेल्या आकर्षक रोषणाई आणि सजावटीचा फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. (Sakshi Mahajan Marriage Ritual Started)

View this post on Instagram

A post shared by Saksshhi Mahajan (@mahajan_sakshi_official)

साक्षी महाजन आणि अथर्व कर्वे हे दोघे ६ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, गेल्याच वर्षी एका मुलाखतीत साक्षीनं २०२६ मध्ये लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी साक्षीनं अथर्व कर्वेबरोबर लग्नगाठ बांधणार असल्याचं जाहीर केलं. तर साक्षी महाजन ही स्टार प्रवाहवरील ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील कलाकारांनी तिचं सेटवर खास केळवणदेखील साजरं केलं होतं. अशातच आता अभिनेत्री अथर्वबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. (Sakshi Mahajan Marriage Ritual Started)

आणखी वाचा: कॅप्टन्सी टास्कदरम्यान रुचिता-करणची मारामारी, ‘बिग बॉस’च्या घरात करणचा राग अनावर, रुचिताच्या अंगावर धावून गेला अन्…

Tags: Kon Hotis Tu Kaay Zaalis Tu Serialmarathi actressSakshi MahajanSakshi Mahajan Marriage Ritual Started
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Nandita Patkar opinion

“पैसे थकवल्यावर कलाकार आवाज उठवू शकतो” मंदार देवस्थळी वादावर ‘एलिझाबेथ एकादशी’ फेम अभिनेत्रीचं स्पष्ट भाष्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.