मंगळवार, एप्रिल 28, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचं ठरलं लग्न, ‘हा’ आहे अपूर्वाचा होणार नवरा; ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 3, 2026 | 1:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Apoorva Gore Wedding News

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचं ठरलं लग्न

Apoorva Gore Wedding News : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा गोरे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चाहते नेहमीच उत्सुक असतात. अशातच अपूर्वाने शेअर केलेल्या एका खास पोस्टमुळे तिच्या आयुष्यातील नवीन पर्व सुरू होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अपूर्वा गोरेने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटोस शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती एका मुलासोबत दिसत असून, चाहत्यांच्या मते हा तिचा होणारा नवरा असू शकतो. असं म्हटलं जात आहे.

या फोटोसोबत अपूर्वाने दिलेलं कॅप्शन अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे. तिने कॅप्शनमध्ये, “चाफा आणि तो मला खूप आवडतात” असं लिहित #ठरलं हा हॅशटॅग वापरला आहे. याच कारणामुळे अनेकांनी अपूर्वाचं लग्न ठरल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये अपूर्वा पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. तिने हिरव्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे, गळ्यात नाजूक ठुशी घातली आहे. तिचा हा साधा-सुंदर आणि पारंपरिक लूक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – २ महिन्यांपूर्वी लग्न आणि आता आईचं निधन; मराठी अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर, म्हणाली “मला संसारात पाडून तू मात्र निघून गेलीस”

View this post on Instagram

A post shared by Apurva (@apurvagore)

मात्र या फोटोमध्ये अपूर्वाने तिच्या सोबत असलेल्या व्यक्तीचा चेहरा मुद्दामहून दाखवलेला नाही. त्यामुळेच तिचा होणारा नवरा नेमका कोण आहे?, हा प्रश्न सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. अपूर्वाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी तिची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आता खरंच अपूर्वा गोरेचं लग्न ठरलं आहे का?, आणि तिच्या आयुष्यातील हा खास व्यक्ती नेमका कोण आहे?, याची उत्तरे ती स्वतः कधी देणार?, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

आणखी वाचा – “मला तुझे शरीर पाहायचे आहे…”, साऊथ अभिनेत्रीने सांगितला वाईट अनुभव, फोटोग्राफरची अश्लील मागणी अन्…

Tags: Apoorva Gore Wedding Newsentertainmentmarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bharat kapoor death
Entertainment

‘चंद्रकांता’ फेम अभिनेत्याचे वयाच्या ८०व्या वर्षी निधन, राकेश बेदी अंत्यसंस्काराला उपस्थित

एप्रिल 28, 2026 | 9:42 am
Gayatri Datar Wedding
Entertainment

Gayatri Datar Wedding : कुर्यात सदा मंगलम्! अखेर गायत्री दातारचा शाही विवाहसोहळा संपन्न, पहिला फोटो आला समोर

एप्रिल 27, 2026 | 2:34 pm
Rohan Gujar Twins Baby
Entertainment

‘होणार सून मी…’ फेम अभिनेता झाला बाबा, लग्नाच्या आठ वर्षांनी केलं जुळ्या मुलांचं स्वागत, बाळांची नावं…

एप्रिल 27, 2026 | 12:12 pm
Riteish Deshmukh to Bageshwar Baba
Entertainment

छत्रपती शिवाजी महाराजांबत चुकीचं वक्तव्य करणं बागेश्वर बाबांना पडलं महागात, अभिनेता भडकला

एप्रिल 27, 2026 | 11:11 am
Next Post
Sakshi Mahajan Marriage Ritual Started

मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, पारंपरिक लग्नविधींना सुरुवात, फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.