माणसाचं या जगात येणं जस ठरलेलं असत म्हणतात तसचं माणसाचं जाणं बहुदा ठरलेलं असाव. नियतीच्या या नियमानुसार मराठी चित्रपट सृष्टीतील सदाबहार अभिनेत्री सुलोचना दीदी यांनी आज जगाचा निरोप घेतला.
मागच्या महिन्याभरापासून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितल जात होत. आज त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि दादरच्या शुश्रुषा हॉस्पिटल मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.(Sulochana Latkar Death)
मराठी मधील साधी माणस, सांगते ऐका अशा अनेक तर हिंदी मध्ये देखील अनेक चित्रपटांमध्ये काम करून सुलोचना यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मनोरंजन सृष्टीतील त्यांच्या योगदाना बद्दल त्यांना पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले होते.
वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे.(Sulochana Latkar Death)
मराठी चित्रपसृष्टी बहारदार बनवण्या बद्दल आणि अभिनयाची नवीन वाख्या निर्माण करणाऱ्या अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या आत्म्यास देव शांती देवो.