यंदाच्या वर्षी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांनी दमदार कामगिरी केली. यावर्षी आलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. चित्रपटाने ३० दिवसात जवळपास ७० कोटींची कमाई केली. या चित्रपटामध्ये महिलांच्या जीवनातील संघर्ष दाखविण्यात आला असून सहा बहीणींची कथा असलेला हा चित्रपट अनेकांच्या मनाला भिडला. (Sukanya Mone On Instagram)
चित्रपटाने मिळवलेल्या भरघोस यशामुळे वर्षाच्या अखेरीस चित्रपटाच्या टीमकडून दमदार सेलिब्रेशन करण्यात येत आहे. यानिमित्त आज १६ डिसेंबरला मुंबईत या चित्रपटाचा खास शो ठेवण्यात आला आहे. या खास शोसाठी चित्रपटातील अनेक कलाकारांकडून हजेरी लावण्यात आली आहे. यावेळी अभिनेत्री सुकन्या मोने, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, दिपा चौधरी यांनी या खास सोहळ्याला हजेरी लावली. तसेच या कलाकारांच्या कुटुंबियाकडूनही या सोहळ्याला खास हजेरी लावून या सोहळ्याची शोभा वाढवण्यात आली आहे.
अशातच या सोहळ्यातील एक व्हिडीओ साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या या खास सोहळ्याला सुकन्या मोने यांच्या आईनेही खास हजेरी लावत या सोहळ्याला आणखी शोभा आणली आहे. या सोहळ्यात लेकीचं कौतुक पाहण्यासाठी सुकन्या मोने यांची आईने खास हजेरी लावली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून सुकन्या मोने यांचं व त्यांच्या आईचे कौतुक होत आहे.
आणखी वाचा – श्रेयस तळपदेच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, तब्बल ४८ तासांनी अभिनेत्याने प्रतिसाद दिला अन्…
तसेच, या खास सोहळ्याला अभिनेत्री वंदना गुप्ते यांनीही उपस्थिती लावली आहे. या खास सोहळ्यानिमित्त वंदना गुप्ते यांची बहीण राणी वर्मा व त्यांच्या पतीनेही खास हजेरी लावली आहे. दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सूचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर व दिपा सावंत-चौधरी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.