Shruti Atre Shared Goodnews : सोशल मीडियावर कलाकार मंडळी लग्नाच्या, साखरपुड्याच्या, आई-वडील झाल्याच्या अनेक आनंदाच्या बातम्या देत आहेत. कलाकार मंडळी त्यांच्या चाहत्यांसह हे आनंदाचे क्षण शेअर करत आहेत. तर काही अभिनेत्री त्यांच्या प्रेग्नेंसीची गुडन्यूजही हटके पद्धतीने देताना दिसतात. अशातच मराठी मालिकाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने अभिनेत्रीने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. यंदाच्या मदर्स डेच्या निमित्ताने या अभिनेत्रीने आई होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. बेबी बंप फ्लॉन्ट करत तिने ही गुडन्यूज दिली आहे. आणि ही अभिनेत्री म्हणजे श्रुती अत्रे. मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक म्हणजे श्रुती अत्रे.
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ ही मालिका घराघरांत प्रसिद्ध झाली. या मालिकेतील प्रत्येक पात्राने स्वतःची अशी ओळख निर्माण करत रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. या मालिकेमुळे श्रुतीला विशेष लोकप्रियता मिळाली. श्रुतीने या मालिकेत राजश्री ढाले पाटील ही भूमिका साकारली होती. श्रुतीचे हे खलनायिकेचे पात्र नेहमीच चर्चेत राहिलेलं पाहायला मिळालं. या पात्रामुळे तिला विशेष ओळख मिळाली. याशिवाय श्रुतीने अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली पाहायला मिळाली.
आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस, सुंदर फोटोशूट करत दाखवला चेहरा, नाव आहे…
मालिकांमध्ये चर्चेत असणारी श्रुती सोशल मीडियावर एका विशेष कारणामुळे चर्चेत आली आहे. श्रुती लवकरच आई होणार आहे. मदर्स डेच्या निमित्ताने श्रुतीने बेबी बंप फ्लॉन्ट करत आई होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे. २०१९ मध्ये श्रुतीने लग्न केले. अश्विन यांच्याशी श्रुतीने विवाह केला. लग्नाच्या सहा वर्षांनी श्रुतीने आई होणार असल्याची आनंदाची बातमी दिली आहे. श्रुती ने ही पोस्ट खास कॅप्शन देत शेअर केली आहे.
“यंदाचा मातृदिन माझ्यासाठी वेगळा आहे. आमचं कुटुंब आता मोठं होणार आहे आणि ही गोड बातमी तुम्हा सर्वांबरोबर शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हा प्रवास सोपा नव्हता… या प्रवासात प्रचंड अडचणी आल्या, काही भीतीचे क्षण होते. पण, या सगळ्यात आमच्याबरोबर तुम्हा सर्वांचं प्रेम कायम होतं. प्रत्येक आईला आणि लवकरच आई होणाऱ्या प्रत्येक महिलेला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एक नवीन सुरुवात मातृत्व, मदर्स डे स्बेशल” अशा भावना श्रुतीने पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या आहेत. श्रुतीच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.





