Shivani Sonar Wedding : सध्या सिनेविश्वात लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. तर काही कलाकारांच्या घरी लगीनघाई सुरु असलेली दिसतेय. अशातच मालिकाविश्वातील दोन लोकप्रिय चेहरे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. हे कलाकार म्हणजे अभिनेत्री शिवानी सोनार व अभिनेता अंबर गणपुळे. शिवानी व अंबर यांची लगीनघाई बरेच दिवसांपासून सुरु असलेली पाहायला मिळतेय. आता लवकरच ही जोडी लग्नगाठ बांधणार आहे. शिवानी व अंबर मालिकांमधील चर्चेत असलेलं चेहरे आहेत. दोघांनी थेट साखरपुडा समारंभ उरकत प्रेमाची कबुली दिली यापूर्वी त्यांच्या नात्याबद्दल फार कुणाला ठाऊक नव्हते. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल काळातच साऱ्यांनाच धक्का बसला.
शिवानी सोनारचा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, ९ एप्रिलला अंबर गणपुळेशी साखरपुडा झाला होता. कुठलाही गाजावाजा न करताना शिवानी व अंबरने गुपचूप साखरपुडा उरकला होता. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. साखरपुड्याच्या सात महिन्यांनंतर शिवानी व अंबर लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी याबाबतची अपडेट दिली आहे.
आणखी वाचा – घरात काम करणाऱ्या व्यक्तींबरोबर कसे वागतात सैफ अली खान-करीना कपूर खान, तैमूरच्या नानीनेच केला खुलासा

शिवानीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये शिवानी पारंपरिक अंदाजात व नवऱ्या मुलीच्या वेशात पूजेला बसलेली दिसतेय. अष्टवर असं कॅप्शन देत शिवानीने हा फोटो पोस्ट केला आहे. यावेळी शिवानी लग्नापुर्वीच्या विधींना बसलेली दिसतेय. लाल रंगाची काठपदरची साडी, त्यावर मोत्याचे व पारंपरिक दागिने शिवानीने परिधान करत खास लूक केला आहे. कपाळावरील मुंडावळ्यांनी तर शिवानी नवऱ्यामुलीच्या वेशात खूपच सुंदर दिसत आहे.
आणखी वाचा – इब्राहिम नव्हे तर तैमूरच सैफ अली खानला रुग्णालयात घेऊन आल्याची डॉक्टरांची माहिती, रक्तबंबाळ झाला होता अन्…
‘रंग माझा वेगळा’, ‘दुर्वा’, ‘लोकमान्य’ या मालिकांमधून अंबर गणपुळेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तर ‘राजा राणीची गं जोडी’ आणि ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकांमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. काही दिवसांपूर्वीच रंग माझा वेगळाच्या संपूर्ण टीमने शिवानी व अंबर यांच्या केळवणाचा घाट घातला होता. त्याचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.