शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“स्नेहलता तावडेने मला त्रास दिला”, सविता मालपेकरांचं धक्कादायक विधान, म्हणाल्या, “रात्री १२ वाजता…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 15, 2024 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actress Savita Malpekar said that she was harassed by Snehalata Tawde-Vasaikar on the set of Lakshmi Vs Saraswati.

“मालिकेच्या सेटवर स्नेहलता तावडेने त्रास दिला”, सविता मालपेकरांनी अभिनेत्रीबद्दल केला खुलासा, जाणून घ्या...

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील ‘सोयरा बाईसाहेब’ म्हणून घराघरांत पोहोचलेली आणि करिअरच्या सुरुवातीलाच नकारात्मक भूमिका अगदी चोख वठवत प्रेक्षकांची वाहवा मिळवणारी अभिनेत्री म्हणजे स्नेहलता तावडे-वसईकर. सोयराबाई यांची भूमिका चांगल्याप्रकारे वठवून अभिनेत्री स्नेहलताने प्रेक्षकांच्या कौतुकाची पावती मिळवली आहे. आजवर अनेक मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या स्नेहलताबद्दल आता अभिनेत्री सविता मालपेकर यांनी एक मोठा खुलासा केला आहे. सविता मालपेकर यांनी स्नेहलताकडून मालिकेच्या सेटवर त्रास झाला असल्याचे म्हटलं आहे. सविता मालपेकर यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीत याविषयी भाष्य केलं आहे. (Savita Malpekar on Snehalata Tawde-Vasaikar)

यावेळी सविता मालपेकर यांनी असं म्हटलं की, “माझ्या कारकिर्दीतली पहिली मालिका असेल ज्यात मालिकेच्या सहकलाकाराने मला खूप त्रास दिला. म्हणजे मी अनेक कलाकारांबरोबर कामे केली. जुन्या आणि नवोदित कलाकारांबरोबरही कामे केली आहेत. पण कुणीही मला त्रास दिलेला नाही. पाठीमागे बोलत असतील तर त्याकडे मी कधी लक्ष दिलं नाही. स्नेहलता तावडेने मला खूप त्रास दिला. त्यावेळी काहीही आसायचं. रात्री १२ वाजता त्यावेळच्या हेड श्रावणी देवधरला फोन करुन काही सांगायची. पण एक दिवसही श्रावणीला असं वाटलं नाही की, मला समोरून विचारावं”.

आणखी वाचा – लोकप्रिय बॉलिवूड गायकाच्या कॉन्सर्टसाठी तेलंगणा सरकारकडून नोटीस, ‘या’ गाण्यांवर घातली बंदी, नेमकं असं काय झालं?

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “मला खूप त्रास व्हायला लागला आणि मग मी एकेदिवशी रात्री सांगितलं की, जय हिंद जय महाराष्ट्र. कारण जिथे आनंद मिळत नाही तिथे पैसे मिळून तरी काय उपयोग. पैसे सर्वांनाच मिळतात. त्यासाठीच सगळे काम करतात. पण त्याचा अर्थ असं नाही की जिथे आनंद नाही मिळणार. यामुळे मी पैशांनी कमी श्रीमंत असेल, पण मी कामाचा आनंद आधी शोधते. कामाचा आनंद मिळणार असेल तर मी पैसे विचारत पण नाही”.

आणखी वाचा – चार वर्षांनी शशांक-मृणाल यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला, मालिकेच्या प्रोमोने वेधलं लक्ष, चाहतेही खुश

दरम्यान, सविता यांनी त्यांना ज्या मालिकेच्या सेटवर त्रास झाल्याचे सांगितले होते ती मालिका होती ‘दुर्गा वर्सेस सरस्वती’ ही मालिका. या मालिकेत त्यांनी लक्ष्मी नावाच्या कोळी स्त्रीची भूमिका त्यांनी साकारली होती. काही काळ काम केल्यावर त्यांनी ही मालिका सोडली आणि मालिकेच्या टीमवर अनेक आरोप केले. यामुळे हे प्रकरण खूप गाजलं होतं. अशातच आता सविता यांनी त्या प्रकरणी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे आणि स्नेहलताबद्दलही खुलासे केले आहेत.

Tags: marathi actressMarathi newsSavita Malpekar on Snehalata Tawde-Vasaikar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Navri Mile Hitlerala serial update Leela promised marriage to Yash and Revathi and AJ take decision regarding them.

Navri Mile Hilerla : लीलाकडून यश आणि रेवतीचे लग्न लावण्याचे वचन, पण एजेंचा निर्णय काही वेगळाच, मालिका नव्या वळणावर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.