छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. या कार्यक्रमातून सई चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. गेल्या अनेक दिवसांपासुन सईचे प्रेग्नंसी फोटोशूट चांगलेच चर्चेत होते. अशातच तिने नुकतीच सोशल मीडियावर आई झाल्याची बातमी सर्वांबरोबर शेअर केली होती. १७ डिसेंबर रोजी तिला कन्यारत्न प्राप्त झाले होते. आई झाल्याची गुडन्यूज सांगत तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. (Sai Lokur On Instagram)
सईने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये असे म्हटले होते की, “आमच्या बाळाच्या येण्याची बातमी सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आई व बाळ दोघंही सुखरुप आहे. सगळ्यांच्या प्रेमासाठी व शुभेच्छांसाठी खूप धन्यवाद.” या पोस्टला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला होता. अशातच नुकताच सईने तिच्या मुलीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. सईने हॉस्पिटलबाहेरचा एक फोटो शेअर करत “आम्ही घरी येत आहोत” असं म्हटलं आहे. या फोटोमध्ये सईच्या हातात तिचे बाळ व नवरादेखील दिसत आहे.
या खास पोस्टसह तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरीदेखील पोस्ट केली आहे. यात तिने असे म्हटले आहे की, “तुम्ही सर्वांनी दाखवलेल्या प्रेम व शुभेच्छाबद्दल धन्यवाद. तुमचे हे प्रेम पाहून मी खूप भारावून गेले आहे. आम्ही दोघीही आता सुखरूप असून घरी आलो आहोत आणि आराम करणार आहोत. थोडी विश्रांती घेऊन मी पुन्हा येईन.” यापुढे तिने पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद म्हटले आहे.

दरम्यान सईने तिच्या बाळाबरोबर शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. मराठीतील अनेक कलाकार मंडळींसह तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत सईचे अभिनंदन केले आहे. तसेच “तू खूप छान दिसत आहेस, बाळाला आणि तुला नजर लागायला नको, दोघांना खूप शुभेच्छा आणि प्रेम” अशा अनेक कमेंट्स करत सईचे कौतुक व अभिनंदन केले आहे.