उत्तम नृत्यांगना, उत्तम अभिनेत्री, उत्तम अभिनेत्री, उत्तम निवेदिका, उत्तम कवयित्री, उत्तम उद्योजिका अशा चतुरस्त्र भूमिका अगदी लीलया पार पाडणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनेत्री, कवयित्री, नृत्यांगना, निवेदिका, उद्योजिका अशा विविध जबाबदाऱ्या निभावणारी प्राजक्ता लवकरच ‘निर्माती’ या नवीन जबाबदारीसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्रीने अलीकडेच निर्माती म्हणून तिच्या आगामी ‘फुलवंती’ या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाचा टिझर पोस्ट करत तिने ही आनंदाची बातमी दिली होती.
अशातच प्राजक्ताने याच चित्रपटाबद्दल आणखी एक बातमी शेअर केली आहे. प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चित्रपटाच्या अपडेटबद्दल सांगितले आहे. प्राजक्ताने काही शूटिंगदरम्यानचे काही फोटो एकत्र करत एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा खास व्हिडीओ शेअर करत तिने “And It’s Wrap. ज्या क्षणाची मी गेलं पूर्ण वर्ष चातकासारखी वाट पाहत होते; तो क्षण” असं म्हणत चितेपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे.
यापुढे तिने तिच्या या चित्रपटाविषयीच्या भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “शिवोहम क्रिएशन्सचा पहिला प्रकल्प तसेच निर्माती’ व ‘एक्झिक्युटर’ म्हणून काल ‘फुलवंती’ चित्रपटाचे दुसरे आणि अंतिम शेड्यूल पूर्ण केले. ‘फुलवंती’ हा माझ्यासाठी खूप खास प्रकल्प आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी या प्रकल्पासाठी जास्तीत जास्त वेळ आणि लक्ष दिले आहे. तसेच या प्रकल्पाने मला जीवनातील सर्वात शहाणपणाचे धडे शिकवले. मला प्रचंड शक्ती, स्वातंत्र्य देत मला योद्धा बनवले. जे माझ्या पाठीशी कायम उभे राहिले,मला पाठिंबा दिला आणि मदत केली त्या सर्वांची मी आभारी आहे”.
यापुढे तिने “ज्यांनी मदत केली नाही, दुर्लक्ष केले आणि त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांचे पुरेसे आभार मानू शकत नाही. सरते शेवटी, हे सर्वकाही माझ्यासाठी योग्यच झाले. कारण यातून आम्ही शिकलो आणि आम्ही तरलो. तसेच मला खरोखर जाणीव आहे की, आम्ही साध्य करु शकतो की नाही”. यापुढे तिने तिच्या गुरुंचे आभार मानत असं म्हटलं की, “एक अतिशय शक्तिशाली दैवी ऊर्जा या प्रकल्पाला मार्गदर्शन, संरक्षण आणि चालवत होती. त्या ऊर्जेबद्दल गुरुदेव सदैव कृतज्ञ आहे” तसेच पुढे तिने दिग्दर्शिका स्नेहल तरडे, लेखक प्रवीण तरडे व महेश लिमये यांचेही आभार मानले आहेत.