कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या नात्याची कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का दिला. ही अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. पूजा नेमकं कोणाला डेट करते? याबाबत यापूर्वी अनेक चर्चा रंगल्या. तिचं काही मराठी अभिनेत्यांबरोबरही नाव जोडलं गेलं. मात्र या सगळ्या चर्चांना पूजाने पूर्णविराम देत सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. (Pooja Sawant Romantic Photo)
पूजाने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे काही फोटो शेअर केले. या फोटोला लक्षवेधी कॅप्शन देत प्रेमात असल्याचं चाहत्यांना सांगितलं. त्यांनतर पूजाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दाखवत फोटो पोस्ट केले. पूजाने तिच्या बॉयफ्रेंडसह साखरपुडा करत सगळ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. रिंग फ्लॉन्ट करतानाचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. पूजाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा फोटो शेअर करत त्याचं नावही सांगितलं आहे. सिद्धेश चव्हाण असं पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे.
सिद्धेश चव्हाणबरोबरचे अनेक रोमँटिक फोटो पूजाने सोशल मीडियावरून पोस्ट केले आहेत. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे. अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या आणखी एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पूजाने शेअर केलेल्या रोमँटिक फोटोने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. पूजाने तिच्या होणाऱ्या पतीच्या मांडीवर बसून पोज देत फोटो काढला आहे. या फोटोला “मला माहित आहे, मी कुठे असणार आहे, तुझ्या हृदयात माझी जागा राखून ठेव” असं कॅप्शन दिलं आहे.
रोमँटिक पोस्ट देत शेअर केलेला हा फोटो साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट करत हार्ट ईमोजी शेअर केली आहे. आता पूजा व सिद्धेश केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.