शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पहिल्या वटपौर्णिमेसाठी अशी नटली पूजा सावंत, परदेशात असलेल्या नवऱ्याची येत आहे आठवण, म्हणाली, “आज मी तुला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 21, 2024 | 1:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pooja sawant vatpornima

पहिल्या वटपौर्णिमेसाठी अशी नटली पूजा सावंत, परदेशात असलेल्या नवऱ्याची येत आहे आठवण, म्हणाली, "आज मी तुला…"

आज समस्त महिलावर्ग वटपौर्णिमा पूजा करताना दिसत आहेत. यांमध्ये आता नवोदित लग्न झालेल्या महिलांची पहिलीच वटपौर्णिमा आहे. आणि ही वटपौर्णिमा या महिला अगदी थाटामाटात साजरी करत आहेत. अशातच काही नव्या लग्न झालेल्या अभिनेत्रींचीही यंदा पहिलीच वटपौर्णिमा आहे. गेल्या वर्षभरात अनेक कलाकार जोड्या या लग्नबंधनात अडकल्या. यांमध्ये अभिनेत्री पूजा सावंत हिचेही नाव आहे. पूजाची यंदा पहिली वटपौर्णिमा असून तिने ही वटपौर्णिमा अगदी थाटामाटात साजरी केली असल्याचं पाहायला मिळत आहे. (Pooja sawant vatpornima)

नुकतेच पूजाच्या या वटपौर्णिमेचे फोटो तिने व तिची बहीण रुचिरा हिने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. पहिली वटपौर्णिमा असं कॅप्शन देत तिने साज शृंगाराचा फोटो पूजाने शेअर केला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये पूजाने तिच्या ताटात वाण असलेला फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोला वटपौर्णिमा असं कॅप्शन देत हा फोटो तिचा नवरा सिद्धेशला टॅगही केला आहे. तर पूजाची बहीण रुचिरा हिनेही ‘बहिणीची पहिली वटपौर्णिमा’ असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – पहिल्या वटपौर्णिमेसाठी श्रीवर्धनला बायकोच्या माहेरी पोहोचला प्रथमेश परब, दोघांच्या पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओ व फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

वटपौर्णिमेला पूजाने खास पारंपरिक लूक केला होता. भरजरी आणि काठापदराच्या पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत होती. मोजकेच दागिने परिधान करत तिने केलेला शृंगारही लक्ष वेधून घेत आहे. नाकात नथ, गळ्यात मोत्याचा हार आणि हिरवा चुडा करत पूजाने खास लूक केला होता. लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा पूजाने अगदी उत्साहात साजरी केली आहे. ‘आज मी तुला खूप मिस करत आहे’, असं कॅप्शन देत पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्टही शेअर केली आहे.

आणखी वाचा – Bigg Boss OTT 3 : ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात १६ स्पर्धक दाखल, कार्यक्रमाचा प्रीमियर केव्हा, कुठे आणि कसा पाहता येणार, जाणून घ्या

२८ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली. पूजाच्या संगीत, हळदी तसेच लग्नाआधीच्या काही विधींचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळाले. या फोटो व व्हिडीओना चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळाला. पूजाचा नवरा कामासाठी ऑस्ट्रेलिया येथे असून सध्या तो लग्नासाठी भारतात परतला आहे. पूजाचा नवरा हा मूळचा मुंबईचा असून त्यांचं अरेंज मॅरेज आहे.

Tags: marathi actresspooja sawantpooja sawant husbandPooja sawant vatpornima
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
anil kapoor on fitness

"रात्रभर दारू, सिगारेट पिऊन…", अनिल कपूर यांचं त्यांच्या घरी होणाऱ्या बॉलिवूड पार्ट्यांबाबत धक्कादायक वक्तव्य, म्हणाले, "मी झोपायचो पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.