शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री पल्लवी सुभाषच्या आईचे निधन, कुटुंबीय हळहळले, व्यक्त केलं दुख

Saurabh Moreby Saurabh More
जून 12, 2024 | 2:21 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Pallavi Subhash's mother passed away and she shared a post on social media

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री पल्लवी सुभाषच्या आईचे निधन, कुटुंबीय हळहळले, व्यक्त केलं दुख

‘कुंकू झालं वैरी’, ‘आयला रे’, ‘तुझं माझं जमेना’, ‘नो प्रॉब्लेम’, ‘हॅप्पी जर्नी’ यांसारख्या चित्रपटात झळकलेली व हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय मराठी अभिनेत्री पल्लवी सुभाषला मातृशोक झाला आहे. पल्लवीच्या आईंचे निधन झाले असून आई गेल्याचे दु:ख व्यक्त करत पल्लवीने सोशल मीडियावर आईबद्दल एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “आई, काल सूर्य मावळत असताना मी स्वतःला आपण शेअर केलेल्या असंख्य आठवणींची आठवण करून देत होते. तुझे अतूट प्रेम, तुझा हळुवार स्पर्श, तुझी सांत्वन देणारी उपस्थिती हे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. आज, जेव्हा मी तुझ्याशिवाय माझ्या जीवनाचा प्रवासात अनुभवत आहे, तेव्हा मला तुझी शक्ती, तुझी आणि तुझ्या निस्वार्थ पाठिंबा या गोष्टींची आठवण येत आहे. तुझ्या प्रत्येक शब्दात खरेपणा व आपलेपणा होता.

View this post on Instagram

A post shared by Pallavi Subhash (@pallavi.subhash)

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मला माहित आहे की तू माझ्यावर लक्ष ठेवून आहेस. तुझे प्रेम प्रत्येक नवीन दिवसाला धैर्याने सामोरे जाण्याचे सामर्थ्य देते आणि याचं मला समाधान आहे. आपण एकमेकांबरोबर घालवलेल्या आठवणींना जवळ घेऊन वेळेच बंधन तोडून आपण लवकरच एके दिवशी परते भेटू याची मला खात्री आहे”.

आणखी वाचा – अधिपती-अक्षरामध्ये जवळीक, स्वयंपाकघरातच एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले, मात्र भुवनेश्वरीला आनंद पाहवेना

यापुढे तिने “तुझे प्रेम माझ्या हृदयात कायम असेल. आपण एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणाची मीए जाणीव ठेवीन आणि माझ्या प्रत्येक गोष्टीत तुझ्या आठवणींचा आदर करेन. तू हे जग सोडून गेली असशील आई पण तुझा आत्मा त्या सर्वांच्या मनात असेल जे तुला ओळखतात आणि प्रेम करतात. तुझी कायमची आठवण येईल, तुझ्यावर मी कायम प्रेम करत राहिन”.

आणखी वाचा – Video : नाक टोचून घेताना सोनाराच्या दुकानातच जोरजोरात ओरडली क्रांती रेडकर, शेवटी रडली अन्…; शेअर केला संपूर्ण व्हिडीओ

पल्लवीच्या या पोस्टवर अनेकांनी तिच्या आईबद्दल शोक व दु:ख व्यक्त केलं असून अनेकांनी तिला कमेंट्समध्ये श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच तिला या दु:खातून बाहेर येण्यासाठी धीरही दिला आहे.

Tags: marathi actressPallavi SubhashPallavi Subhash mother passes awayPallavi Subhash mother passes away news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
man dhaga dhaga jodate nava

"आनंदी पुन्हा ये", 'मन धागा धागा'ने घेतलं सहा वर्षांचं लीप, मयुरी देशमुखच्या एन्ट्रीनंतर प्रेक्षकांच्या कमेंट, म्हणाले, "आनंदी-सार्थकची जोडी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.