सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : नाक टोचून घेताना सोनाराच्या दुकानातच जोरजोरात ओरडली क्रांती रेडकर, शेवटी रडली अन्…; शेअर केला संपूर्ण व्हिडीओ

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 12, 2024 | 12:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kranti Redkar getting her nose pierced funny video shared on social media.

Video : नाक टोचून घेताना सोनाराच्या दुकानातच जोरजोरात ओरडली क्रांती रेडकर, शेवटी रडली अन्...; शेअर केला संपूर्ण व्हिडीओ

हल्ली सोशल मीडिया हेही मनोरंजनाचे एक साधन झाले आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकजण वेगळ्या प्रकारचा कंटेट तयार करतात. मराठीतील अनेक कलाकारही सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनयाव्यतिरिक्त कंटेट तयार करत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. अशा अनेक कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. क्रांतीच्या व्हिडीओला चाहत्यांकडूनदेखील उत्तम प्रतिसाद मिळत असतो. 

अभिनेत्री क्रांती रेडकरने तिच्या अभिनयाने व नृत्यकौशल्याने अनेकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. क्रांती ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. क्रांती ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रांतीने तिचं नाक टोचतानाचा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

आणखी वाचा – अधिपती-अक्षरामध्ये जवळीक, स्वयंपाकघरातच एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले, मात्र भुवनेश्वरीला आनंद पाहवेना

या व्हिडीओमध्ये क्रांतीचे नाक टोचताना ती घाबरलेली दिसत आहे. तसेच यावेळी ती जोरात रडतेही. त्याचबरोबर ती तिच्या मैत्रीणीला तू इतकी ओरडली नाहीस तुला दुखलं नाही का असं म्हणते. यानंतर ती तिच्या मैत्रीणीला तू खोटी आहेस असंही म्हणताना दिसत आहे. यादरम्यान, तिच्या डोळ्यातून अश्रुदेखील वाहतात. “माझा नाक टोचण्याचा अनुभव” असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला असून “माझ्या १६ वर्षांच्या भाचीने नाक टोचताना आवाजही काढला नाही. आणि इथे माझ्याकडे पाहा” असं म्हटलं आहे. यानंतर क्रांती मी आता नाक टोचले असून याआधीचे माझे चार प्रयत्न अयशस्वी झाले असल्याचे म्हणते.

आणखी वाचा – Video : बायकोच्या आठवणीत अविनाश नारकरांचा चालत्या गाडीतच डान्स, व्हिडीओही केला शेअर, बायकोने दिले थेट उत्तर

दरम्यान, अनेकांनी क्रांतीला कमेंट्समध्ये नाक टोचल्यानंतर घेतल्या जाणाऱ्या काळजीविषयक सूचनाही दिल्या आहेत. या व्हिडीओखाली एका चाहतीने क्रांतीला “वाह. गोड दिसत आहे. तुझ्या सौंदर्यात अजून एक भर. पण नाकाला अजिबात डिवचू नको” असं म्हटलं आहे. तर “मलाही नाक टोचताना असाच अनुभव आला होता. खूप अश्रू आले होते. हे तुला तुला शोभत आहे” असं म्हटलं आहे.  तसेच क्रांतीच्या या व्हिडीओला तिच्या चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.  

Tags: kranti redkarmarathi actressmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
neena kulkarni troll

"कुळकर्णी व मासे कसे खाता?", पापलेट, कोळंबी, खेकडे खाण्यावरुन नीना कुळकर्णींना नेटकऱ्यांनी सुनावलं, यामध्ये अभिनेत्रीचं चुकलं काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.