सुप्रसिद्ध व प्रेक्षकांची लाडकी गायिका मुग्धा वैशंपायनच्या घरी सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. मुग्धाचं नाही तर मुग्धाच्या मोठ्या बहिणीचं म्हणजेच मृदुलच्या लग्नाची धामधूम सध्या सुरु झाली आहे. लवकरच मृदुल विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. मुग्धाच्या बहिणीच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचंही पाहायला मिळत आहे. मुग्धा व प्रथमेश या दोघांनीही मृदुलच्या लग्नाआधीच्या विधींचे फोटोस सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. (Mugdha Vaishampayan Sister Wedding)
प्रथमेश लघाटेने खास मेहुणीच्या मेहंदी सोहळ्याचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर मुग्धानेही तिच्या ताईचा मेहंदीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुग्धाच्या ताईच्या हाताला मेहंदी लागली असल्याने मुग्धा तिची विशेष काळजी घेताना दिसत आहे. मुग्धा तिला जेवण भरवतानाही दिसत आहे. मुग्धा व मृदुलचं अनोखं बॉण्ड आहे. दोघीही उत्तम बहिणी आहेत.
मुग्धाने ताईला हळद लागल्यानंतरचा एकत्र फोटो ही पोस्ट केला होता. हा फोटो शेअर करत तिने ताईची हळद असं कॅप्शन दिलं होतं. त्यानंतर आता मुग्धाच्या बहिणीचे ग्रहमखचे फोटो समोर आले आहेत. मुग्धाच्या बहिणीच्या ग्रहमखच्ये फोटोनी लक्ष वेधून घेतलं आहे. अत्यंत साधेपणाने हे सगळे विधी पार पडत आहेत. यांत तिच्या बहिणीचा पारंपरिक अंदाज साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ताईच्या ग्रहमखसाठी मुग्धा व प्रथमेश यांनीही पारंपरिक पोशाख घातलेला पाहायला मिळत आहे. मुग्धाने नेसलेल्या साडीत ती खूपचं गोड दिसत आहे. तर प्रथमेशने ही मेहुणीच्या ग्रहमखसाठी पारंपरिक कुर्ता परिधान केला आहे.
आता मुग्धाच्या ताईच्या लग्नातील फोटो पाहण्याची उत्सुकता वाढून राहिली आहे. शिवाय मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर आता मुग्धा व प्रथमेश केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे ही साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.