कट्यार काळजात घुसली, नटसम्राट यांसारख्या अनेक चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे मृन्मयी देशपांडे. नुकतंच तिने सारगेमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनदेखील केले होते. ती सोशल मीडियावर आपले अनेक स्टायलिश फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिच्या अनेक फोटोंना लाईक्स व कमेंट्सद्वारे चाहत्यांकडून पसंती मिळत असते. अशातच तिच्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मृन्मयी व तिचा नवरा स्वप्नील राव यांच्या लग्नाला ७ वर्षे पूर्ण झाल्यामुळे या जोडीने त्यांचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि याच फोटोमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Mrunmayee Deshpande On instagram)
मृण्मयीने स्वप्नील राव याच्याशी २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला ७ वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात ते एकमेकांना लिपलॉक करताना दिसत आहेत. “७! आय लव्ह यू राव…” असं म्हणत तिने हा खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र या फोटोमुळे तिला ट्रॉलिंगलादेखील सामोरे जावे लागले आहे. अभिनेत्रीच्या या फोटोखाली नेटकऱ्यांनी नकारात्मक कमेंट्स करत तिच्यावर टीका केली आहे.
अनेक नेटकऱ्यांनी या फोटोखाली टीका करत असे म्हटले आहे की, “मराठी कलाकार आहात, मराठी संस्कृती जपा, हल्ली प्रेम जगजाहीर करण्याची फॅशनच आली आहे, हे तुझे एकांतातले क्षण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नसतात, तू साधी मुलगी आहेस अशी उथळ वागू नकोस, प्रेम व रोमान्स हा चार भिंतीत व्यक्त केला पाहिजे असा सोशल मीडियावर नाही, ही आपली संस्कृती नाही आपल्या बायकांनी असं केलेलं चालत नाही तुम्ही सगळे पाश्चात्य संस्कृतीमुळे बिघडत चालला आहात, लाजा सोडल्या तुम्ही” अशा अनेक कमेंट्स करत तिला ट्रोल केले आहे.

दरम्यान, तिने शेअर केलेल्या या फोटोवर सोनाली अभिनेत्री कुलकर्णी, पूजा सावंत, अमृता खानविलकर, नम्रता संभेराव, प्रार्थना बेहेरे, सायली संजीव त्याचबरोबर अभिनेता अभिजीत खांडकेकर, सुव्रत जोशी, गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांसारख्या अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे व त्यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनीदेखील या फोटोला पसंती दाखवली आहे.