लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आजवर तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये मृण्मयीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. याशिवाय बऱ्याच रिऍलिटी शोचे सूत्रसंचालन करूनही तिने रसिक प्रेक्षकांची मन जिंकली. मृण्मयीने अभिनय क्षेत्र तर गाजवलंच याशिवाय ती शेती व्यवसायाकडेही वळली आहे. अभिनयातून ब्रेक घेत ती शेती करते, याचबरोबर आता मृण्मयी शेती व्यवसायाकडेही वळली आहे.(Mrunmayee Deshpande On Husband)
गेल्या काही वर्षांपासून मृण्मयी शेती करण्यात रमली आहे. अभिनयातून मोकळं वेळ मिळाला की ती तिच्या पतीबरोबर महाबळेश्वर येथे शेती करत असते. मृण्मयी व तिचा पती २०२० पासून मुंबई सोडून महाबळेश्वर येथे राहत आहे. त्यांनी महाबळेश्वरला छोटंसं टुमदार घरही बांधलं आहे. ती अनेकदा तिचे तिच्या शेतातले फोटो व व्हिडिओही चाहत्यांसह शेअर करत असते. त्यानंतर आता तिने शेतीपूरक व्यवसायही सुरू केला आहे.
अशातच साध्य मृण्मयी तिच्या नवऱ्याबरोबर महाबळेश्वर येथे क्वालिटी टाइम शेअर करताना दिसत आहे. तिने नुकताच त्यांच्या शेतातील एक व्हिडीओ स्टोरीवरून पोस्ट केला आहे. यांत मृण्मयीचा नवरा स्वप्नील राव व त्यांचा पेट मस्ती करताना दिसत आहेत. याशिवाय स्वप्नीलने ही एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मृण्मयी व स्वप्नील स्ट्रॉबेरीची शेती करण्याची तयारी करत आहेत.

स्वप्नीलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, मृण्मयी तिच्या पतीबरोबर स्ट्रॉबेरीची शेती बनवायला लागणारे गवत आणायला गेली आहे. स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी त्यांनी नॅचरल गवत आणलं आहे. ज्याबद्दल ते या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्वप्नील स्ट्रॉबेरीच्या शेतीबाबतची माहिती देताना दिसत आहे. सध्या मृण्मयी पतीबरोबर महाबळेश्वर येथे क्वालिटी टाइम शेअर करताना दिसत आहे.