Mrunal Dusanis : मराठी सिनेसृष्टीत अशी अनेक कलाकार मंडळी आहेत जी अभिनयाबरोबरच व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असल्याचं पाहायला मिळतं. अनेक कलाकार मंडळींनी अभिनयाची आवड जोपासत काहीतरी नवीन सुरु केलेलं पाहायला मिळालं आहे. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या एका व्हिडीओने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीची नवीन काहीतरी सुरु करणार असल्याची चाहूल पाहायला मिळतेय. ‘हे मन बावरे’, ‘तू तिथे मी’ या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचली अभिनेत्री म्हणजेच मृणाल दुसानिस. मराठी मालिका विश्वातील हा लोकप्रिय चेहरा नेहमीच चर्चेत राहिलेला पाहायला मिळाला.
मात्र काही वर्षांपासून मृणालही मालिका विश्वापासून दूर असलेली दिसली. २०१६ साली मृणालने लग्न केलं आणि त्यानंतर ती तिच्या नवऱ्याबरोबर अमेरिकेत स्थायिक झाली. आणि मृणाल अमेरिकेत राहत असल्यामुळे मालिका विश्वातून तिने ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळालं. यानंतर आता मृणाल तिच्या पती व मुलीसह भारतात परतली आहे. लवकरच मृणाल ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील एका मालिकेतून मालिका विश्वात कमबॅक करणार असल्याचे समोर आले आहे.
आणखी वाचा – “हलक्यात घेऊ नका”, सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई गॅंगकडून पुन्हा धमकी, केली ‘इतक्या’ कोटींची मागणी अन्…
मृणाल दुसानिस आणि तिचा नवरा नीरज मोरे यांनी मिळून इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका जागेचं इंटिरियर डिझायनिंग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने “लवकरच काहीतरी नवीन घेऊन येत आहोत. तुम्ही ओळखू शकता का नेमकं काय सुरु आहे?”. या कॅप्शनबरोबर “लॉन्चिंग सून’, ‘नवीन उपक्रम’, ‘कमिंग सून’, ‘स्टे ट्यून” असे टॅग्ज अभिनेत्रीने वापरले आहेत. त्यामुळे आता मृणाल नवीन व्यवसाय सुरु करणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : पारू-आदित्यचे जुळतायत सूर, मारुतीची त्यांच्या मैत्रीला नापसंती, पुढे काय होणार?
“नवीन सॉफ्टवेअर कंपनी”, “भारतात परतल्यानंतर नवीन व्यवसाय”, “नवीन हॉटेल किंवा बिझनेस असणार…”, “माझ्यामते नव्या व्यवसायाची ही झलक आहे”, “जे काही असेल त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पण तरीही माझे ३ अंदाज आहेत स्वतःचं नवीन घर, स्वतःचं प्रोडक्शन हाऊस किंवा स्वतःचं ऑफिस”, “नवीन व्यवसाय exicited”, अशा अनेक कमेंट चाहत्यांनी अनेक तर्क बांधले आहेत. मृणालची ही नवी सुरुवात नेमकी कसली आहे याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.