अभिनेत्री मिताली मयेकर व अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ही मराठी सिनेसृष्टीतील बेधडक जोडी म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी ही जोडी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मिताली तर तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे विशेष चर्चेत असते. यामुळे अनेकदा ती ट्रोल होतानाही दिसते. मात्र ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत त्यांची मितालीने बोलतीही बंद केली आहे. बरेचदा मितालीला नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यावर तिचा पती सिद्धार्थने नेटकऱ्यांना खडेबोल सुनावले पाहायला मिळाले. (Mitali Mayekar Post)
मितालीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मिताली व सिद्धार्थ ही प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. मिताली सध्या अभिनयापेक्षा तिच्या सोशल मीडियावरील वावरामुळे अधिक लोकप्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच ती स्पष्टपणे तिचे विचार मांडताना दिसते. मितालीला जग फिरण्याची विशेष आवड आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती परदेश दौरे करताना दिसत आहे.
मितालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्टोरीवरुन पोस्ट शेअर करत तिने महिलांना अंतर्वस्त्र न घालण्याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. त्यावर तिने महिलांना खास सल्लाही दिला आहे. “अंतर्वस्त्र न घालता एखादे ओव्हरसाईज कपडे घालणं म्हणजे स्वत:ची सर्वोत्तम काळजी घेण्यासारखंच”, अशा आशयाची एक पोस्ट मितालीने शेअर केली आहे. यावर तिने “महिलांनो यावर बोला”, असं कॅप्शन देत ही पोस्ट शेअर केली आहे.

सध्या मितालीची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. मितालीने महिलांना दिलेला हा सल्ला लक्षवेधी ठरला असून सोशल मीडियावर ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरली आहे. मितालीने आजवर अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांची मन जिंकली. याशिवाय तिने मालिकांमधून छोटा पडदाही गाजवला.